AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case : लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी खरात विकायचा खास मध.. 9 लाखांना बाटली आणि..

Ashok Kharat Case: नाशिकमधून अटक करण्यात आलेला भोंदू बाबा ​​अशोक खरात, सध्या प्रचंड चर्चेत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि फसवणुकीचे आरोप त्याच्यावर आहेत. SITकडून त्याच्या संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी करण्यात येत असून मोठी अपडेट समोर आली आहे.

Ashok Kharat Case : लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी खरात विकायचा खास मध.. 9 लाखांना बाटली आणि..
खरातच्या काळ्या कारनाम्यांची यादी संपेचना Image Credit source: social media
| Updated on: Mar 24, 2026 | 11:01 AM
Share

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातच्या काळ्या कृत्यांची यादी संपतच नसून रोज नवनव्या घटना, उघडकीस येत आहेत, त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारा असल्याचा दावा करणारा अशोक खरात, धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता, त्यांना लुबाजत होता, अनेक महिलांवर त्याने अत्याचार केला,त्यांचं लैंगिक शोषणही केलं. हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. याचदरम्यान आता पोलिसांच्या तपासात त्याचा नवा कारनामा उघड झाला आहे. भोंदू अशोक खरात ने “तुर्की मध” विकून लोकांची फसवणूक केली होती.

कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मध असल्याचा दावा

तुर्की मध हाँ अतिशय दुर्मिळ, कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून त्याने अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने मधाची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीमधील समुद्रातील गुहांमधून काढलेल्या या एल्व्हिश मधामध्ये शारीरिक अशक्तपणा दूर करण्याची विशेष क्षमता आहे. त्याने विशेषतः लैंगिक समस्यांनी त्रस्त असलेल्या पुरुषांना लक्ष्य केले होतं असंही उघड झालं.

1 किलो मधाची किंमत 9 लाख रुपये

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कथित मधाची किंमत प्रचंड होती. 1 किलो मधासाठीजवळपास 9 लाख रुपये उकळले जायचे. तपास यंत्रणांच्या मते, अनेक प्रमुख व्यावसायिक आणि काही राजकीय व्यक्ती मोठ्या प्रमाणात रक्कम भरून, या फसवणुकीला बळी पडले. या संपूर्ण नेटवर्कने कोट्यवधी रुपयांचे अवैध उत्पन्न मिळवल्याचा संशय पोलिसांना आहे.

ट्रस्टच्या खात्यात जमा व्हायचे पैसे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने हे पैसे थेट स्वतःकडे ठेवण्याऐवजी ते त्याच्या ट्रस्ट खात्यांमध्ये जमा केले होते, ज्याचा वापर काळा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी केला गेला. तपास यंत्रणांना या संशयास्पद व्यवहाराशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावेही सापडले आहेत. या बनावट तुर्की मधाने किती लोकांची फसवणूक झाली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे, हे शोधून काढण्यासाठी पोलीस आता सखोल तपास करत आहेत.

आणखी 3 नवे गुन्हे दाखल

दरम्यान भोंदू खरात विरोधात आणखी तीन नवे गुन्हे दाखल झाले असून आता एकूण गुन्ह्यांची संख्या 6 वर पोहोचली आहे. खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून या नराधमाने विद्यार्थिनीला देखील सोडलं नाही, असा गंभार आरोपही त्याच्यावर आहे. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. लग्न, धार्मिक विधी व तंत्र-मंत्राच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप आहे, तसेच अमानुष लैंगिक अत्याचार केल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत.

एवढंच नव्हे तर जमिनी खरेदी व्यवहारात मोठी फसवणूक केल्याचा आरोप असून पाथर्डी परिसरातील सुमारे 25 एकर जमीन व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची जमीन परत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान खरातची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पुन्हा पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

Follow Us
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत