AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक, मुंब्रा नाही, या शहरात लपून बसली होती निदा खान, सुनसान फ्लॅट आणि… सोबत लपलेले 5 लोक कोण? गूढ वाढले

नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणात फरार आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेऊन नाशिकमध्ये आणले. एसआयटी नऊ प्रकरणांची चौकशी करत असताना ही मोठी घडामोड घडली आहे. तिच्या अटकेमुळे या संवेदनशील प्रकरणातील निधी स्रोत आणि धर्मांतरण नेटवर्कचे मोठे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक, मुंब्रा नाही, या शहरात लपून बसली होती निदा खान, सुनसान फ्लॅट आणि… सोबत लपलेले 5 लोक कोण? गूढ वाढले
कुठे लपली होती निदा खान ?Image Credit source: social media
| Updated on: May 08, 2026 | 8:53 AM
Share

नाशिक टीसीएस (TCS case) कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. टीसीएस कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीच्या धर्मांतराचे प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळ यांच्याशी संबंधित दाखल झालेल्या नऊ प्रकरणांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात पोलिसांना काल रात्री मोठं यश मिळालं. TCS कंपनी प्रकरणात फरार असलेली महिला आरोपी निदा खान हिला अखेर अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर नाशिक येथे आणून अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्चपासून फरार असलेल्या निदा खानचा, नाशिक पोलिसांचे दोन पथक शोध घेत होते. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर येथील नरेगावमधील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले.

कुटुंबासह एका फ्लॅटमध्ये लपली होती निदा खान

सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार, आरोपी निदा खन हिच्यासह त्या फ्लॅटमध्ये तिची आई, वडील, भाऊ आणि आत्या यांच्यासह एकूण पाच जण राहत होते. ती गेल्या चार दिवसांपासून नारेगावच्या कैसर कॉलनीतील या फ्लॅटमध्ये लपली होती. पोलीस गेल्या दोन दिवसांपासून फ्लॅटवर नजर ठेवून होते. अखेर तिथून तिला ताब्यात घेण्यात आलं. काल रात्री निदा खान हिला नाशिक येथे आणण्यात आलं. आज तिला नाशिक येथील कोर्टात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

वारंवार फेटाळला अटकपूर्व जामीन

यापूर्वी, निदा खानने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होती, मात्र स्थानिक न्यायालयाने निदा खानचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज वारंवार फेटाळला होता. विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला तपास अहवाल न्यायालयासमोर सादर केला आणि निदा खानच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. यापूर्वी, 20 एप्रिल रोजी न्यायालयाने निदा खानला अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला होता.

नाशिकच्या कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी निदा खानच्या आधी अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी चार मुख्य आरोपींना 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ह्या आरोपींमध्ये रझा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी यांचा समावेश आहे.

काय आही प्रकरण ?

निदा खान ही टीसीएसची निलंबित कर्मचारी आहे. ती कंपनीच्या नाशिक युनिटमध्ये काम करत होती. महिलांवर लैंगिक अत्याचार करणे, त्यांना मानसिक छळ करणे आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप तिच्यावर आहे. यापूर्वी पोलिसांनी याच प्रकरणात सहा कर्मचाऱ्यांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून फरार होती आणि नाशिक पोलिसांची 2 पथकं तिचा शोध घेत होती.

मोबाईल-डायरीमुळे उलगडणार गुपित ?

निदा खान विरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आयटी कंपनीच्या नाशिक युनिटमधील कामाच्या वातावरणाबद्दल धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, निदा खान हिने महिला सहकाऱ्यांवर इस्लामिक परंपरा स्वीकारण्यासाठी दबाव टाकला, ज्यात कपडे आणि आहाराच्या सवयी ठरवून देणे यांचा समावेश होता. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, निदाने तक्रारदारांपैकी एकाला बुरखा आणि हिजाब दिला, तिला नमाज शिकवला आणि मोबाईल फोनवर इस्लामिक शिक्षणाशी संबंधित एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले.

एवढंच नव्हे तर पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याचा आणि तिला नोकरीसाठी मलेशियाला पाठवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोपही आहे. तपासकर्त्यांच्या सांगण्यानुसार, निदा खानचा मोबाईल फोन आणि डायरी हस्तगत करण्यासाठी तिची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. कारण त्यातून बाहेरून मिळणाऱ्या निधीचे स्रोत आणि मालेगाव व मलेशियातील धर्मांतरण नेटवर्कशी असलेले मोठे संबंध उघड होऊ शकतात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?