चर्चा तर होणारचः नाशिक महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक; मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता? 

| Updated on: Jun 17, 2022 | 5:57 PM

नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत एकूण 211 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी 4 पथके तयार केली आहेत. आता यावर येत्या 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

चर्चा तर होणारचः नाशिक महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक; मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता? 
Nashik Municipal Corporation.
Follow us on

नाशिकः गेल्या अनेक दिवसांपासून होणार-होणार म्हणून चर्चेत असलेल्या नाशिक (Nashik) महापालिका (municipal corporation) निवडणुकीचा मुहूर्त अखेर लागलाय. येत्या एप्रिलमध्ये ही निवडणूक (election) होण्याची शक्यताय. त्यासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 वर नेण्यात आलीय. त्यामुळे यंदा निवडणूक रंगणार आहे. महापालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. खरे तर तोपर्यंत निवडणुका होऊन महापालिकेला नवे कारभारी मिळायला हवेत. किमान या काळात आचारसंहिता तरी लागलेली असावी. मात्र, तसे नाही झाले तर महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊ शकते. हेच ध्यानात घेता निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केल्याचे समजते.

तर रचना बदलणार?

नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना यापूर्वी एकदा बदलण्यात आलीय. सुरुवातीला 122 नगरेसवक गृहीत धरून ही रचना करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने लोकसंख्या वाढल्याचे कारण पुढे करत नगरसेवकांची संख्या वाढवली. त्यामुळे तयार झालेला आरखडा बदलावा लागला. नव्याने आराखडा तयार करण्यात आला. यात बराच वेळ लागला. आता ओबीस आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्यावर काही वेगळा निर्णय आला, तर पुन्हा एकदा रचना बदलावी लागू शकते. मात्र, तसे झाले तरी निवडणूक लांबणीवर पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे समजते.

एकूण 211 हरकती

नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत एकूण 211 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी 4 पथके तयार केली आहेत. आता यावर येत्या 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे. बहुतांश इच्छुकांनी काही मातब्बर मंडळींनी स्वतःच्या सोयीसाठी प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप केलाय. यापूर्वीही एका नगरसेवकाच्या घरात बसून प्रभाग रचना तयार केल्याची चर्चा महापालिकेतच रंगली होती.

अशी होणार निवडणूक…

– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!