AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील मोबाईलमध्ये गुंग, मुलगा धावत आला अन्… नाशिकमध्ये 5 वर्षीय चिमुकल्याचा चिरडून मृत्यू

नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलच्या पार्किंगमध्ये 5 वर्षीय ध्रुव राजपूत याचा कार अपघातात मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

वडील मोबाईलमध्ये गुंग, मुलगा धावत आला अन्... नाशिकमध्ये 5 वर्षीय चिमुकल्याचा चिरडून मृत्यू
Nashik child accident
| Updated on: Feb 07, 2025 | 4:00 PM
Share

नाशिकच्या सिडको परिसरात एका 5 वर्षीय चिमुकल्याला कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमधील हा प्रकार घडला आहे. ध्रुव अजित राजपूत (5 वर्ष) असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. वडिलांचे मोबाईलमध्ये लक्ष असताना ही घटना घडल्याचे बोललं जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. ध्रुव अजित राजपूत (5) हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून वडिलांसोबत परत जात होता. त्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदाला घेऊन हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांचं खेळून झाल्यानंतर ते पुन्हा त्या दोघांना घरी घेऊन जात होते. त्याचवेळी अजित यांचं लक्ष मोबाईलमध्ये होते. तेवढ्याच ध्रुव हा वडिलांचा हात सोडून लॉबी धावत आला. त्याचवेळी एका ईनोव्हा गाडीने त्याला चिरडलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

यात ध्रुव हा पळत येताना दिसत आहे. त्याने गाडी दिसल्यानंतर स्वत:ला थांबण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो घसरला आणि गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकासमोरच पडला. ते चाक त्याच्या अंगावरुन गेलं. मुलाच्या अंगावरुन कार गेल्याचं लक्षात येताच अजित यांना धक्काच बसला. त्यांना मुलाला उचलले. ध्रुव हा निपचित पडल्याचे पाहून अजित यांनी कार चालकाला मारहाण केली.

यानंतर ध्रुवला गंभीर दुखापत झाली. त्याला त्याच्या वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?