AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या” गावात भरली नऊ हजार पाहुण्यांची शाळा, तुम्ही कधी अनुभवलीत का?

पक्षांची शाळा भरणाऱ्या नांदूरमधमेश्‍वरसह चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, गोदावरी पात्र, कोठूर, कुरुडगाव, काथरगाव या ठिकाणी झालेल्या पक्षी प्रगणनेत झाडांवरचे दोन हजार 198 तर, सहा हजार 905 पाणपक्षी नोंदवले गेले.

या गावात भरली नऊ हजार पाहुण्यांची शाळा, तुम्ही कधी अनुभवलीत का?
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 14, 2022 | 7:54 AM
Share

नाशिक : देशातील अशी काही गावं आहेत की जेथे दरवर्षी देश-विदेशी पक्षांचा मेळा भरत असतो. त्यापैकी एक नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्‍वर हे एक गाव आहे. येथील अभयारण्यात हिवाळ्यात हजारो विविध प्रकारचे देश-विदेशी पक्षी येत असतात. पर्यटकांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच असते. यानिमित्ताने हजारो पर्यटक नांदूरमधमेश्‍वरच्या अभयारण्यात भेट देत असतात. यंदाच्या वर्षी तर नऊ हजार 103 पाहुणे आल्याची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी मासिक पक्षी प्रगणना झाल्यावर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदूरमधमेश्‍वरच्या अभयारण्यात आलेल्या पाहुण्या पक्षामध्ये विविध प्रकारचे पक्षी दिसून येत आहेत. त्यापैकी अनेकांचे लक्ष वेधून घेणारे हिमालयातील चक्रवाक पक्ष्यासह कॉमन क्रेन नॉर्दन शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन व्हिजन, गडवाल, मार्श हेरिअर, ब्ल्यू चिक बी इंटर या पक्षांनी येथे हजेरी लावली आहे. इतकंच काय तर उघड्या चोचीचा बगळा, जांभळा, बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, सुनवल, रिव्हीर टर्न, कमळपक्षी, शेकाट्या, जांभळी पाणकोबडी, नदीसुरय असे विविध स्थानिक स्थलांतरित पक्षी ही बघायला मिळत आहे.

नुकतेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी पक्षी निरीक्षण केले आहेत. त्यानंतर पक्षी प्रगणना संपल्यानंतर पक्षीमित्रांना पक्ष्यांना बर्ड रिंगींग कसे करतात याचे प्रात्यक्षिक देण्यात आले आहे.

पक्षांची शाळा भरणाऱ्या नांदूरमधमेश्‍वरसह चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, गोदावरी पात्र, कोठूर, कुरुडगाव, काथरगाव या ठिकाणी झालेल्या पक्षी प्रगणनेत झाडांवरचे दोन हजार 198 तर, सहा हजार 905 पाणपक्षी नोंदवले गेले.

नुकतेच करण्यात आलेले बर्ड रिंगिंग ही प्रकिया परदेशी आहे. अलिकडच्या काळात ती भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ब्रिटन आणि युरोपसह जगाच्या इतर भागात बर्ड रिंगिंग हा शब्दप्रयोग केला जातो.

यामुळे देशात पक्ष्यांच्या एक हजार 263 प्रजाती आणि 470 स्थलांतरीत प्रजाती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. देशात पक्ष्यांचा होणार प्रवास बघता टीनाची राहण्याची जागा आणि ये जा करण्याचे ठिकाण निश्चित नसून बर्ड रिंगिंगचा मोठा फायदा होत आहे.

नाशिक येथील असलेल्या नांदूरमधमेश्‍वर येथे दरवर्षी हजारो पक्षांचा मेळा भरत असतो मात्र त्याची माहिती गोळा करणे, त्याची योग्यप्रकारे नोंद करणे शक्य होत नसल्याने अडचणी येत होत्या.

बर्ड रिंगिंगमुळे नाशिकच्या नांदूरमधमेश्‍वर येथील येणाऱ्या देश -विदेशातील अनेक प्रजातीच्या पक्षांची माहिती मिळणे अधिक सोपे होणार असून पर्यटक आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाठी सहज उपलब्ध होणार आहे.

येथील पक्षाचा मेळा अनुभवण्यासाठी काही काळ आणि वेळ निश्चित असते, यंदाच्या वर्षी याबाबत अधिकची माहिती समोर आल्याने पर्यटकांची पाऊले नांदूरमधमेश्‍वरकडे वळू लागली आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.