Nashik new corona restrictions| आजपासून नवे निर्बंध; 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस

| Updated on: Jan 10, 2022 | 9:31 AM

नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही.

Nashik new corona restrictions| आजपासून नवे निर्बंध; 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस
corona test
Follow us on

नाशिकः कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता नाशिक जिल्ह्यात आजपासून नवे कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असेल. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये आता चक्क दिवसाला 1 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन अंग झटकून कामाला लागले आहे. येणाऱ्या काळात लसीकरणाला गती देण्याचे प्रयत्नही होणार आहेत.

काय आहेत नवे नियम?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढता सरकारने नवे कोरोना निर्बंध लागू केले आहेत. ते नियम जसेच्या तसे लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू असेल. खासगी कार्यालये आणि विविध आस्थापनांमध्ये 50 टक्के उपस्थिती असेल. प्रवासी वाहतुकीवर सध्यातरी कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. सुरक्षित अंतर पाळावे, नागरिकांनी मास्क घालावा, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

रामकुंड परिसरात अलोट गर्दी

जिल्हा प्रशासनाने एकीकडे नवे निर्बंध लागू केले आहेत. मात्र, दुसरीकडे रामकुंड परिसरात तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांनी कोरोनाचे सारे नियम धाब्यावर बसवले आहेत. सुरक्षित अंतराचे पालन बासनात गुंडाळून ठेवले आहे. बहुतांश जणांच्या चेहऱ्यावर मास्क नाही. त्यामुळे वायू वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनला रोखणार कसे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. दुसरीकडे प्रशासनाने इतक्या नागरिकांवर कारवाई करावी तरी कशी आणि काय, हा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून आता नियम पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस

जिल्ह्यात सोमवारपासून 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर बंधनकारक आहे. 10 एप्रिल 2021 पू्र्वी डोस घेतलेले असे 45 हजार हेल्थ वर्कर्स या मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाय नागरिकांच्या लसीकरणालाही गती देण्यात येणार आहे.

इतर बातम्याः

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत

Nashik Planning: नाशिकच्या योजनांसाठी 807.86 कोटींची आर्थिक मर्यादा; काय आहे यंदाचे नियोजन?

Nashik|कोरोनाचे बळी 4 हजार अन् अनुदानासाठी अर्ज आले 8 हजार; मग मृतांची आकडेवारी खोटी की, अर्जदार बोगस?