AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट; राऊतांनी व्यंकटेश मोरेंचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवले

MP Sanjay Raut showed Devendra Fadnavis and Venkatesh More Photo : सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवले आणि गंभीर आरोप केलेत. ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती!, असा दावा राऊतांनी केला आहे.

सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट; राऊतांनी व्यंकटेश मोरेंचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवले
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 24, 2023 | 3:31 PM
Share

चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, नाशिक | 24 डिसेंबर 2023 : सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो दाखवत संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. व्यंकटेश मोरे यांनी पार्टीचं आयोजन केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सलीम कु्त्ता याच्यासोबत पार्टीत नाचतानाचा व्हीडिओ भाजपकडून दाखवण्यात आला. नितेश राणे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले. मात्र ही पार्टी भाजपच्या नेत्याने आयोजित केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. संजय राऊतांनी थेट पुरावे दाखवत पलटवार केलाय.

राऊत काय म्हणाले?

ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. व्यंकटेश मोरे यांनी आयोजित केलेल्या या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण दिलं होतं. सलीम कुत्ताला संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा. तो एवढा भयंकर गुन्हेगार होता, बॉम्बस्फोटमधला तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडलं. याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

व्यंकटेश मोरेबाबत काय म्हणाले?

आजही व्यंकटेश मोरे नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल, तर आपली परंपरा आहे जाणे, बसणं चर्चा करणं. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतः कडे बघावं, असं राऊत म्हणाले.

व्यंकटेश मोरे कारवाईची मागणी करणार का? असा प्रश्न विचारला. तेव्हा व्यंकटेश मोरेबाबत मी काहीही मागणी करणार नाही. मोरेचे फोटो मी दाखवला. बडगुजर आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा बुरखा कसा फाटका आहे, हे मी दाखवलं आहे, असं राऊत म्हणाले.

ठाकरे गटाच्या शिबिरावर राऊत म्हणाले…

23 जानेवारीला नाशिकला महाशिबिर आणि खुले अधिवेशन हुतात्मा कान्हेरे मैदानावर होईल. महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा दृष्टीने रणशिंग फुंकायचं आहे. ते श्रीरामाच्या भूमीतून फुंकले जावं. अशी उद्धव ठाकरेंची श्रद्धा आणि भावना आहे. त्याची सुरुवात पंचवटीतून लढाईला सुरुवात होईल, असंही राऊतांनी सांगितलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?