रुग्णालयाच्या बाहेर धक्कादायक वास्तव; कर्मचारी संपावर, मृतदेहांची परिस्थिती पाहून तुम्हीही हळहळ व्यक्त कराल…

| Updated on: Mar 17, 2023 | 2:04 PM

एकीकडे जुन्या पेन्शनसाठी संप सुरू असताना दुसरीकडे मात्र रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत मृतदेह पडून आहेत मात्र त्याकडे आरोग्य कर्मचारी बघायला तयार नाहीत.

रुग्णालयाच्या बाहेर धक्कादायक वास्तव; कर्मचारी संपावर, मृतदेहांची परिस्थिती पाहून तुम्हीही हळहळ व्यक्त कराल...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : राज्यातील लाखो कर्मचारी हे जुन्या पेन्शनचा मुद्दा घेऊन संपावर गेलेले आहेत. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी देखील सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडून गेली आहे. संपाचा चौथा दिवस सुरू असून आरोग्य यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एकीकडे संप सुरू आहे मात्र याचा आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या काही फुटावर बेवारस मृतदेह पडलेला असून त्याला उचलण्यासाठी देखील जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी पुढे आले नाही यामुळे मानव जातीला काळिमा फासणारी घटना घडलीय. डोळ्यात अंजन घालणारे हे दृश्य मनाला विचलित करणारे आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर काही रुग्ण देखील उपचाराविना पडून आहेत तर काही मृत अवस्थेत आहे, या रुग्णांकडे आणि मृत व्यक्तींकडे रुग्णालयातील कर्मचारी ढुंकूनही पाहायला तयार नाहीये. त्यामुळे या संपकऱ्यांना काही माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा संतप्त सवाल काही रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलाय.

संप करा मात्र रुग्णांची सेवा ही खंडित होऊ देऊ नका अशी मागणी देखील या वेळेला काही रुग्णांच्या नातेवाईक करत आहे. चार दिवस झाले हा संप सुरू आहे, या संपामुळे आरोग्य व्यवस्था ही पूर्णतः कोलमडली गेली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ही रुग्णसेवा सध्याच्या घडीला सुरू असली आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र दुसरीकडे महत्त्वाचे अनेक उपचार होत नाहीये, कुणाचे ऑपरेशन रखडलंय तर कुणाच्या तपासण्या. त्यामुळे लवकरात लवकर हा संप मिटवून आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सेवा सुरळीत करावी अशा स्वरूपाची मागणी हतबल झालेले रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्ण नाशिकमध्ये करू लागले आहे.

2005 पासून जुनी पेन्शन योजना रद्द झाली आहे. आणि नवीन पेन्शन योजना सुरू झाली आहे. ही नवी पेन्शन योजना मान्य नसल्याचे सांगत अनेकदा शासन दरबारी आंदोलन करण्यात आली, निवेदन देण्यात आली.

मात्र, तरीही तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये लाखो कर्मचारी सहभागी झाले असून सरकारने यावर तोडगा काढावा अशा स्वरूपाची मागणी केली जात आहेत.

शासनाच्या वतीने जुन्या पेन्शन बाबत समिती गठीत करून त्याचा अभ्यास केला जात आहे. त्यामुळे यावर लागलीच तोडगा निघेल याची शास्वती फार कमी आहे. मात्र तरीही या संपकऱ्यांचा निर्धार हा कायम असून जोपर्यंत पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याची भूमिका घेतल्याने रुग्णाचे अधिक हाल होणार आहे.