Nashik Simhastha Kumbh Mela: महाध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज; राष्ट्रपतींसह ‘व्हीआयपीं’ची मांदियाळी, गोदातीर, मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई

Nashik Simhastha Kumbh Mela 2026: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपतींसह व्हीआयपींची मांदियाळी आहे.

Nashik Simhastha Kumbh Mela: महाध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज; राष्ट्रपतींसह व्हीआयपींची मांदियाळी, गोदातीर, मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई
महाध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज; राष्ट्रपतींसह 'व्हीआयपीं'ची मांदियाळी, गोदातीर, मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई
| Updated on: Oct 31, 2026 | 8:04 AM

Nashik Simhastha Kumbh Mela 2026: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज औपचारिक प्रारंभ होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अर्दे राज्य मंत्रिमंडळ, व्हीआयपी आणि विविध आखाड्याच्या साधु-संतांची मांदियाळी होणार आहे.

आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ ध्वजारोहण

Loading...

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होत आहे. रामघाटवर तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, शृंगेरी मठाचे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती स्वामी उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यभरातून 1317 व्हीआयपींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यात आखाड्यांचे प्रमुख, पुरोहित संघाचे पदाधिकारी, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याचा मुख्यमंत्र्यांनी अगोदरच आढावा घेतला. कार्यक्रमस्थळाची सजावट, धार्मिक विधी आणि नियोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामतीर्थ येथे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वय राखून जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले. आज ठीक दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभ ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पर्वाचा औपचारिक प्रारंभ होणार आहे.

ध्वजारोहण सोहळ्यासाठी गोदाघाटावर विशेष प्रकाशयोजना

ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्यासाठी गोदाघाटावर विशेष प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. संपूर्ण रामकुंड परिसर डीएमएक्स पिक्सेल थ्रीडी मॅपिंग आणि पिक्सेल लाईट्सने उजळणार आहे. संगणकाद्वारे दिव्यांचे रंग, ब्राईटनेस आणि सुरू-बंद होण्याची गती नियंत्रित करण्याची सुविधा आहे. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रामकुंड परिसराला भव्य स्वरूप मिळणार आहे. सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणासाठी रामकुंड, गाडगे महाराज पूल आणि कपालेश्वर मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन उभारणार आहे. भाविकांना सोहळा थेट पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने १२०० हून अधिक स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. धार्मिक सोहळ्यासोबत स्थानिक रोजगारालाही चालना मिळणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकलशासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध दरम्यान पृथ्वीवर अमृताचे चार ठिकाणी थेंब पडले. त्यापैकी नाशिक त्र्यंबकेश्वर हे एक स्थान असल्याची मान्यता आहे. आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होईल.

जेव्हा गुरू ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यात ध्वजारोहण अर्थात धर्मध्वज उभारणे हा सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी होत आहे. आजपासून नाशिक आणि त्रंबकेश्वर मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. त्रंबकेश्वर येथे शैव आखाड्यांचे साधू महंत करतात स्नान तर नाशिक येथे वैष्णव आखाड्यांचे साधू महंत स्नान करतात.

महाकाय धर्मध्वजावर काय?

आज शैव आणि वैष्णव दोनही आखाड्यांचे प्रमुख एकत्र येणार , गेल्या अनेक वर्षांची दरी या निमित्ताने भरून निघणार आहे. ध्वजावरील भगवा रंग हा त्याग आणि वैराग्याचे प्रतीक आहे तर त्यावर चित्रित असलेला सिंह हा पराक्रम आणि धर्माच्या रक्षणाचे प्रतीक आहे. धर्मध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हे याचा अर्थ असा की, जोपर्यंत या सृष्टीत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत, तोपर्यंत ही धर्मपरंपरा आणि कुंभमेळ्याची संस्कृती अविरत चालू राहणार आहे. ५१ ते ५५ फूट उंच लाकडी किंवा धातूच्या दंडावर हा ध्वज उभारला जातो . प्रत्येक आखाड्याच्या ध्वजावर त्यांच्या परंपरेनुसार त्रिशूळ, चक्र, गदा किंवा डमरू यांसारखी पवित्र धार्मिक चिन्हे आहेत.

इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. रामकुंड आणि गोदाघाट परिसराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली आहे. या सर्वात मोठ्या आणि पवित्र सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. कुंभमेळ्यात ध्वजारोहण अर्थात धर्मध्वज उभारणे हा सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी होत आहे. आजपासून नाशिक आणि त्रंबकेश्वर मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us