शब्द फुटत नव्हते, अश्रू अनावर, नानांबद्दल बोलताना अण्णा हजारे भावूक; म्हणाले, नाना सारखा माणूस होणे नाही…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अत्यंत भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. नाना पाटेकर म्हणजे समाज आणि देशासाठी दीपस्तंभासारखे होते, असे अण्णा म्हणाले. जलसंधारण, नाम फाउंडेशन अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी मोठे कार्य केले. त्यांचे जाणे म्हणजे समाजासाठी मोठी हानी असून, असा माणूस होणे नाही.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. नाना पाटेकर आपल्यात नाहीत यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाहीये. सेलिब्रिटी असो की नेते सर्वांनाच नानांवर बोलताना अश्रू आवरणे कठिण झाले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे नाना पाटेकरांवर बोलताना अस्वस्थ झाले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. डोळ्यातून अश्रू येत होते. नाना पाटेकरांचं कार्य दीपस्तंभासारखं आहे. त्यांनी खूप मोठं काम केलं. असा माणूस होणार नाही, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नाना पाटेकर गेल्याचं वृत्त ऐकून अण्णा हजारेही अस्वस्थ झाले. मीडियासमोर त्यांना अश्रू आवरणं कठिण झालं. नाना सारखा माणूस होणार नाही. त्यांनी फार मोठं काम केलंय. नुसतं काम केलं नाही, वादळी सागरात संचार करणाऱ्या नौकांना जसा दिपस्तंभ आधार असतो, तसं नाना पाटेकरांचं जीवन दीपस्तंभासारखं आधार होतं. समाज आणि देशासाठी नाना पाटेकर दीपस्तंभासारखे आधार होते. त्यांनी केवळ एकाच क्षेत्रात काम केलं नाही. त्यांनी सर्वच क्षेत्रात खूप मोठं काम केलं. साधा पाण्याचा प्रश्न त्यांनी उचलून धरला. पाणी अडवा, पाणी जिरवा. हे त्यांनी कृतीने करून दाखवलं, असं अण्णा हजारे म्हणाले.
अशी माणसं होणार नाही
अशी माणसं होणार नाही. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं. समाजाला दिशा देणारं काम झालं. माणसं येतात जातात. येणं-जाणं हे एका कालचक्रासारखं सुरू आहे. पण काही माणसं समाजाला दिशा देऊन जातात. देशाला नवीन दिशा देऊन जातात, असं काही माणसांचं जीवन असतं. नाना पाटेकरांच्या जीवनात ते पाहायला मिळालं, असंही अण्णा म्हणाले.
नानांचे जाणे दु:खद
यावेळी पोपटराव पवार यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. नानांचे जाणे दु:खद आहे. दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्राचा आधारवड हरवला. नानांचा आणि हिवरे बाजारचा ऋणानुबंध 22 सप्टेंबर 2015 पासूनचा होता. नानांनी त्यांच्या घरी गणपतीसाठी बोलवले होते. त्यावेळी नानांनी मारलेली मीठी आजही स्मरणात आहे. नाम फाउंडेशनची सुरुवातही हिवरे बाजारपासूनच झाली, असं पोपटराव पवार म्हणाले.
नाना नेहमीच मदत करायचे
दरम्यान, पुण्यातील डोणजे गावात नानांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होणार आहे. या गावावर शोककळा पसरली आहे. या गावातील ग्रामस्थांना तर नाना गेले यावर विश्वासच बसेनासा झाला आहे. नानांनी डोणजे गावात पाण्यासंदर्भात खूप मोठे काम केले आहे. शेती कशी करावी याचं नेहमी ते तरुणांना मार्गदर्शन करायचे. अडचणीच्या वेळी नाना आम्हाला नेहमी मदत करायचे. डोणजे गावासाठी नानांनी खूप काम केलं आहे. नाना गेल्यामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असं ग्रामस्थांनी म्हटलंय.