AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकाला जायचंच आहे, तो काळ येणारच… नाना पाटेकर यांचे चार दिवसांपूर्वीचे अखेरचे शब्द

नाना पाटेकर यांनी गोव्यातील भाषणात समाज आणि जगण्याबाबत मोलाचे विचार मांडले. प्रत्येकाने समाजाचे देणे लागतो, स्वतःला समृद्ध करण्यासाठी सुख-दुःखं अनुभवावीत, असे ते म्हणाले. भूक आणि अपमान हेच खरे गुरू आहेत यावर त्यांनी भर दिला. परखडपणे बोलायला शिका आणि माणसांना महत्त्व द्या, हा त्यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र होता.

प्रत्येकाला जायचंच आहे, तो काळ येणारच... नाना पाटेकर यांचे चार दिवसांपूर्वीचे अखेरचे शब्द
nana patekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 1:02 PM
Share

प्रत्येकाला जायचंच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो काळ येणारच आहे. पण त्या आधी मला जे करायचं ते केलं का? माझं जगणं माझ्या पुरतं मर्यादित असेल, माझं घर, बायको आणि मुलं यांच्या पुरतंच मला जगायचं असेल तर जग आणि मर. पण समाजाचं आपण काही देणं लागतो ना? माझा ओबडधोबड चेहरा तुम्ही मान्य केला. त्यामुळे माझं समाजाप्रती देणं लागतं. ते मी दिलंच पाहिजे, असं नाना पाटेकर म्हणाले होते. चार दिवसापूर्वी नाना पाटेकर यांचं गोव्यात भाषण झालं. त्यांचं हे भाषण शेवटचंच ठरलं.

गोव्यातील पणजी येथे सम्राट क्लब इंटरनॅशनलने 4 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी अभिनय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना नाना पाटेकर बोलत होते. आपण सतत फिरलं पाहिजे. गावकुसातील सुखदु:खं पाहिली पाहिजे. तुमचे पर्सेप्शन बदललं पाहिजे. सुखदु:खाच्या व्याख्या बदलत राहिल्या पाहिजे. त्याने तुम्ही नट म्हणून समृद्ध होता. कालचं सुख आज नाही. आजचं सुख उद्या नाही. यावर्षी दुष्काळ आहे. तिथे जायचं त्यांना भेटाचं. मी हे स्वार्थी बुद्धीने करतो. मला त्यातून काही घेता येतं. मग घेतल्यावर काही दिलं पाहिजे असं वाटतं आणि म्हणून देत राहतो, असं नाना पाटेकर म्हणाले होते.

सुखदु:खं शोधत राहा

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अस्सल अभिनय कसा करायचा हेही सांगितलं. आपल्याकडे रुप नाही. मग काय वाढवायचं तर इंटेन्सिटी. जे काही आहे ते बेंबीच्या देठातून आलं पाहिजे. चेहऱ्यावर एक्सप्रेशन आणावे लागत नाही. ते येतात. भूक आणि अपमान हे माझे मित्र आहेत. वाईट परिस्थिती होती. आठ किलोमीटर चालत जावं लागायचं. महिन्याला 35 रुपये मिळायचे. त्यातून खूप शिकलो. मी अभिनय शिकलो नाही. मला अभिनय येत नाही. मला सुखदु:ख मांडता येतात. सुखदु:ख शोधत राहिलं पाहिजे, असा कानमंत्र नानांनी विद्यार्थ्यांना दिला होता.

माझ्या सातबाऱ्यावर माणसंच माणसं

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटली ना? मग तुमच्या ज्यादा अपेक्षा का वाढतात? माझ्या सातबाऱ्यावर जमिनी नाहीत, पण माणसं खूप आहेत. त्याला मोजता येत नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. मनोहर पर्रीकर माझे मित्र होते. अभिमान वाटावा असा माणूस होता. अरे तुरे करायचो आम्ही. तो वयाने लहान होता. पण त्याचं मोठेपण असं की, त्याच्याकडे वर मान करून पाहावं लागायचं. आपलं नशीब आपल्याकडे असा माणूस जन्माला आला. वसा घेतल्या सारखं जगणारी ही माणसं होती, असं ते म्हणाले होते.

परखडपणे बोलायला शिका

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना परखड बोलण्याचा मंत्र दिला. मोदी जिथे आवडतात, तिथे आवडतात. पण जिथे नाही आवडत, तिथे नाही म्हटलं पाहिजे. आंदोलन म्हणजे काय असतं? आपल्या मनातील ती गोष्ट असते. लहान मुलांना भूख लागते ते रडतं. ते त्यांचं आंदोलन असतं. आंदोलनाची पद्धत वयानुसार बदलते. आपण बोललंच पाहिजे. मी कधीही गलिच्छ शब्द कुणाबद्दल जाहिररित्या बोलणार नाही. आम्ही खासगीत एकमेकांचा गळा पकडतो ती गोष्ट वेगळी. पण सार्वजनिकरित्या नाही. ही साधनशुचिता पाळलीच पाहिजे, असा कानमंत्रही त्यांनी दिला होता.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती