AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bacchu Kadu: भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा इथं या, भोंदू बाबा अशोक खरात याचा सल्ला, मग बचू कडू यांनी केले काय?

Bacchu Kadu and Ashok Kharat: अनेक राजकीय नेते बुवा-बाबांच्या आश्रमात गेल्याशिवाय राहत नाहीत. त्यात नाशिकच्या अशोक खरातचे तर अनेक राजकीय भक्त समोर येत आहेत. त्यात अजून एका नेत्याची भर पडली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या दरबारात प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी सुद्धा हजेरी लावल्याचे समोर आले आहे.

Bacchu Kadu: भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा इथं या, भोंदू बाबा अशोक खरात याचा सल्ला, मग बचू कडू यांनी केले काय?
बच्चू कडू, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 12:05 PM
Share

Bacchu Kadu and Ashok Kharat: नाशिकचा भामटा अशोक खरात याची काळी कृत्य आता समोर आली आहेत. बुवाबाजीच्या नावाखाली त्याने अनेक महिलांचे जीवन नासवले. अनेकांच्या जमिनी हडपल्या आणि अवघ्या काही वर्षात हा भोंदू कोट्याधीश झाला. या भोंदूचे अनेक राजकीय भक्त एकामागून एक समोर येत आहेत. केंद्रीय मंत्र्यापासून ते गल्लीबोळातील नेत्यांपर्यंत अनेक जणांनी त्याच्या आश्रमात हजेरी लावली आहे. अनेकांनी त्याची पाद्यपूजा केली आहे. तर काहींनी त्याच्यासमोर लोटांगण घातले आहे. या यादीत आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे नावही समाविष्ट झाले आहे. या भामट्याने कडू यांना कोणता दिला सल्ला? तो व्हिडिओ का होत आहे व्हायरल?

भाजपात मंत्री व्हाल तेव्हाच इथं या

भोंदू बाबा अशोक खरात सोबतचा बच्चू कडू यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांमधील संवाद समोर आला आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॅप्टन अशोक खरात : I would like to say, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेंव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेंव्हा तुम्ही इथे या!

बच्चू कडू : (पाया पडत) ठीक आहे.

२०२२ च्या महाविकास आघाडी सरकारच्या बंडखोरीत बच्चू कडू शिंदें गटासोबत गुवाहाटीला गेले होते, तरीही त्यांना नवीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे गटासोबत जे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यात बच्चू कडू यांचा समावेश होता.बंडानंतर शिंदे सरकार स्थापन झाले, परंतु बच्चू कडूंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. खरात याच्या भेटीचा बच्चू कडू यांचा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

अनेकांचे या बाबासोबत फोटो

अशोक खरात याच्यासोबतच्या त्या व्हिडिओवबाबत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फोटो तर अनेकांचे अनेकांसोबत आहेत. तसं झालं तर मग मुख्यमंत्र्यांसह सर्वच पळ काढतील.मोदींचा पण फोटो भोंदूबाबासोबत आहे. आपले तर अर्धे राजकारणी बाबा, देवाशिवाय आणि मंदिराशिवाय, धर्माशिवाय यांना काही जमते का हो? त्यांना तर तिथंच पळावं लागतं. मी जर काढत बसलो तर प्रत्येक भागातील भोंदूबाबासोबत त्यांचे त्यांचे फोटो आहेत.फोटोवरून तर्क लावू नये. जर एखाद्यानं नेलं. कार्यकर्त्यानं नेलं आणि तिकडं त्या बाबानं काही केलं. तर आम्ही दोषी आहोत का? भोंदूबाबाची ही जी जमात वाढत आहे, त्याला कारणीभूत आपणच आहोत. लोकही तेवढेच कारणीभूत आहेत अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार