AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राज ठाकरे आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अतियश उघडपणे मनसे अधयक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिलीय.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राज ठाकरे आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता?
| Updated on: Feb 11, 2023 | 8:54 PM
Share

चैतन्य अशोक गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) एक सर्वात मोठी बातमी समोर आलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अतियश उघडपणे मनसे अधयक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिलीय. बावनकुळे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. राज ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करु शकतात, असंही बावनकुले म्हणाले आहेत.

“वैचारिक मनोमिलनासाठी आम्ही कुठेही चर्चा केलेली नाही. राज ठाकरे आमचे एक चांगले आणि दिलदार मित्र आहेत. ते खुल्या मनाने आणि खुल्या विचाराने बोलणारे व्यक्तीमत्व आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मनात एक ठेवायचं आणि बोलायचं वेगळं असे राज ठाकरे नाहीत. कपट कारस्थान करणारे राज ठाकरे नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यावर आमचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांच्या मनात भाजपसोबत यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नेहमी दरवाजे खुले आहेत, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली

विशेष म्हणजे राज ठाकरे आणि भाजप नेत्याचं गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली असल्याचं हे सर्वश्रूत आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचीदेखील भेट झाल्याचं समोर आलं होतं. मध्यंतरी भाजप नेते नारायण राणे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले होते. तसेच नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.

राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढणे, तसेच भाजपने ठाकरेंना युतीसाठी खुली ऑफर देणं या घटना आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला एकटं पाडण्यासाठी भाजपच्या गोटात रणनीती आखली जात आहे. शिंदे गट देखील त्यासाठी कामाला लागलं आहे. असं असताना राज ठाकरे भाजपसोबत गेले तर त्याचा मनसेसह भाजपला देखील फायदा होण्याची शक्यता आहे. पण या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत. याबाबत अधिकृतपणे काही घोषणा होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.