AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लष्कर विभागातही लाचखोरीचं लोन, दोघांना लाच घेतांना सीबीआयने रंगेहाथ पकडले

नाशिकच्या लष्कर हद्दीत सीबीआयच्या पथकाने लाच घेतांना लष्करातील दोघांना अटक केली आहे. सीबीआयच्या पथकाने केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

लष्कर विभागातही लाचखोरीचं लोन, दोघांना लाच घेतांना सीबीआयने रंगेहाथ पकडले
Image Credit source: Social Media
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 14, 2022 | 12:56 PM
Share

नाशिक : कधी नव्हे ती घटना नाशिकच्या (Nashik) लष्कर हद्दीत घडल्याचे समोर आले आहे. नव्याने नाशिकमध्ये स्थापन झालेल्या सीबीआय (CBI) पथकाने नाशिक येथील लष्कर विभागात मोठी कारवाई केली आहे. लष्कर हद्दीत कंत्राटदाराकडून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ सीबीआयच्या पथकाने पकडले आहे. नाशिकच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या लष्कर हद्दीत ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लष्कर हद्दीतही भ्रष्टाचाराची कीड पसरली गेलीय का ? असा सवाल उपस्थित करत चर्चेला उधाण आले आहे. अत्यंत सुरक्षित असलेल्या परिसरात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल च्या आवारात परिसरात ही घटना घडली आहे. एका कंत्राटदाराकडून एक लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये  मेजर हिमांशू मिश्रा कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांनी ही रक्कम मागितली होती. हीच रक्कम गुरुवारी संध्याकाळी उशिरा कॅटच्या आवारात स्वीकारत असताना सीबीआय पथकाने छापा टाकला आणि दोघांना लाच घेतांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या विविध विभागात लाच घेतांना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश येत आहे.

नुकतेच लाच घेतांना मनपा प्रशासनातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते, तर पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कारवाया केल्या आहे.

हिमांशू मिश्रा हे मेजर असून त्यांच्याकडे सहाय्यक गिअर्सन इंजिनियर या पदावर आहेत तर त्याच विभागात मिलिंद वाडीले कनिष्ठ अभियंता म्हणून काम पाहत आहे.

याच विभागातील एका टेंडर मंजूर करण्याकरिता मिश्रा आणि वाडिले यांनी एक लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, याची माहिती सीबीआयचे पोलीस निरीक्षक रंजीत पांडे यांना मिळाली होती.

रंजीत पांडे यांच्या पथकाने संबंधित कंत्राटदाराच्या माहितीनुसार सापळा रचला होता. त्यानुसार लष्कर हद्दीत ही कारवाई करत पांडे यांचा सापळा यशस्वी झाला आहे.

एकूणच या कारवाईने नाशिकसह संपूर्ण लष्कर विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराचे लोन आता लष्करी आस्थापनापर्यन्त पोहचल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे वेळीच ही भराष्ट्राचाराची कीड मारण्याची गरज असल्याची चर्चा जनमानसात होऊ लागली असून सीबीआयने केलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?