नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार

| Updated on: Sep 15, 2021 | 12:32 PM

ऐन महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर नाशिकमधल्या (Nashik) मतदार याद्यांमधील (Voter lists) घोळ उघडकीस आला असून, तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर नाशिकमधल्या (Nashik) मतदार याद्यांमधील (Voter lists) घोळ उघडकीस आला असून, तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे. (Confusion in voter lists in Nashik, 2 lakh 87 thousand names doubled) ही नावे रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिकमध्ये मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील दुबार नावाचा मुद्दा गाजतो आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर चक्क तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने हा घोळ उघडकीस आणला आहे. त्यांनी तीन महिन्यांत मतदार यांद्याची अक्षरशः छाननी केली. तेव्हा नाशिक पश्चिम मतदारसंधात 1 लाख 22 हजार 242 मतदार दुबार आढले. नाशिक पूर्व मतदारसंघात 88 हजार 932 आणि नाशिक मध्य मतदारसंघामध्ये 76 हजार 319 मतदार दुबार आढळले आहेत.

शिवसेनेचा भाजपवर आरोप
नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने मतदारांची नावे दुबार घुसवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या मतदारांच्या बळावरच शहरात भाजपने तीन आमदार निवडून आणले. महापालिकेत 66 नगरसेवकही याच मतदारांमुळे निवडून आले. ही बोगस नावे रद्द करावी, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.

शिष्टमंडळाने घेतली भेट
नाशिकमधील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये घुसवलेली बोगस मतदारांची नाव त्वरित वगळावीत या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. उपायुक्त अविनाश सणस यांना नावे कमी करण्याचे निवेदन दिले. यापूर्वी शिवसेनेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडेही बोगस मतदारांची नावे कमी करावीत, अशी मागणी करत निवेदन दिले आहे. (Confusion in voter lists in Nashik, 2 lakh 87 thousand names doubled )

इतर बातम्याः 

मालेगावचे ‘एमआयएम’चे आमदार म्हणतायत, ‘जीवाला धोका’; पोलिसात तक्रार

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

Nashik is the best: लसीकरणाचा वारू चौखुर, अबब…25 लाख व्यक्तींनी घेतले डोस!