AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : शिवसेना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंची नवीन खेळी, तालुकाध्यक्षांना नव्याकोऱ्या कार देणार आणि..

Eknath Shinde Shivsena: नाशिक जिल्ह्यात शिंदे सेना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी मैदानात उतरली आहे. त्यासाठी तालुकाध्यक्षांना नव्याकोऱ्या कार दिल्या जाणार आहेत. अजून काय आहे पक्षाची योजना?

Eknath Shinde : शिवसेना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंची नवीन खेळी, तालुकाध्यक्षांना नव्याकोऱ्या कार देणार आणि..
एकनाथ शिंदे, नाशिकImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Sep 19, 2026 | 9:21 AM
Share

नाशिक जिल्ह्यात संघटनवाढीसाठी शिंदेसेनेची नवी रणनीती समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर पक्षाचा फोकस आहे. नाशिकमध्ये भाजपसोबत शिंदे सेनेची कुरबुर जुनीच आहे. आता पक्षा संघटन बळकट करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. त्यासाठी खास रणनीतीही आखण्यात आली आहे. पक्ष नेत्यांना, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांना नव्याकोऱ्या कार देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मांड ठोकता येणार आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

तालुकाध्यक्षांच्या दिमतीला वाहनं

शिंदे सेनेने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. तालुकाध्यक्षांना पक्षाच्या कामासाठी मोटारी देण्यात येणार आहे. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने १३ मोटारींची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातही पक्षाला मजबूत जनाधार मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दौरे करता येणार आहे. त्यांना पक्ष वाढीचे काम करता येणार आहे. पक्षाच्या कामासाठी त्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. पक्षाकडूनच ही तरतूद करण्यात येत असल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या मोटारींवर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. शिवसेना आपल्या दारी अभियानातून गावागावात संपर्क साधतील. तालुकाध्यक्षांवर घरोघरी पक्ष पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोटारींच्या वापराचा दैनंदिन अहवाल घेतला जाणार आहे. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थित पुढील आठवड्यात लोकार्पणाची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदेत भगवा फडकवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येते.

बच्चू कडू आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट

दरम्यान तिकडे अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू आणि खासदार डॉ.अनिल बोंडे यांची भेट झाली. या भेटीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बोंडे यांच्या कार्यक्रमात बच्चू कडूंची उपस्थितीने लक्ष वेधले. मागील काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि अनिल बोंडे यांच्यामध्ये टीका टिपणी सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजपचे राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांची भेट झाली आहे. डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू यांनी हजेरी लावली. गेल्या काही काळातील राजकीय घडामोडी आणि पार्श्वभूमीवर, या दोन बड्या नेत्यांमधील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं