कोरोना लसीचा काहीच भरोसा नाही? लस घेतली तरी कोरोना झाला! नेमकं काय काय झालं?

| Updated on: Feb 02, 2021 | 5:00 PM

50 वर्षांच्या या कर्मचाऱ्याला लसीकरण मोहिमेदरम्यान लस देण्यात आली. | Corona vaccine

कोरोना लसीचा काहीच भरोसा नाही? लस घेतली तरी कोरोना झाला! नेमकं काय काय झालं?
मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद पडायला सुरुवात झाली आहे.
Follow us on

नाशिक: कोरोनाची लस घेतली म्हणजे आपल्याला परत कधीच कोरोना (Coronavirus) होणार नाही अशा अविर्भावात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी नाशिकमधून आलेली ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लस घेतल्यानंतर दहाव्या दिवशी पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर लस घेतल्यानंतर सुद्धा प्रत्येकाने किती काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे अधोरेखित झाले आहे. (Health workers infected with coronavirus after taking covid vaccine)

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातच आरोग्य सेवक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला लसीकरण मोहिमेनंतर दहाव्या दिवशी कोरोनाची लागण झाली आहे. 50 वर्षांच्या या कर्मचाऱ्याला लसीकरण मोहिमेदरम्यान लस देण्यात आली. मात्र, त्याच्या घरातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली.

त्यामुळे लस घेतल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशीच या कर्मचाऱ्याला कोरनटाईन व्हावं लागलं आहे. लस घेतल्यानंतर पुढची लस 20 दिवसानंतर घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर सुमारे 14 दिवसांनी शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे फक्त एकदा लस टोचून घेतली की आता आपल्याला कोरोना कधीच होणार नाही, या धुंदीत असलेल्या अनेकांसाठी हा एक मोठा धडा असल्याचे मानले जात आहे.

या संपूर्ण घटनेनंतर संबंधित व्यक्ती नेमका कोणाच्या संपर्कात आला आहे का याचा तपास घेतला जात आहे. मात्र, या घटनेनंतर लसीकरण मोहिमेदरम्यान नागरिकांनीदेखील किती सावधान राहणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरोनाची लस लहान मुलांसाठी कितीपत फायदेशीर?

काही देशांमध्ये आता कोरोनाची लस तयार झाली आहे.तर काही देशांमध्ये कोरोनाची लस देण्यासाठीही सुरुवात झाली आहे. आधी लस कुणाला देणार यासाठी काही देशांनी प्राधान्य निश्चित केले आहेत. जवळजवळ सर्व देशांमध्ये प्रथम 60 वर्षावरील म्हणजेच वडिलधाऱ्या माणसांना लस दिली जाणार आहे. दरम्यान आता लहान मुलांचं लसीकरण कधी होणार हा प्रश्न येतो.

या प्रश्नाचं उत्तर देताना दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. एके वर्षाणे म्हणालेत की ‘मुलांना लस दिली जाणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग खूप कमी प्रमाणात आढळला आहे.त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, या लसीची चाचणी लहानमुलांवर केली गेली नाहीये. त्यामुळे ही लस लहानग्यांना देण्याचा विचार करु नका, असे एके वर्षाणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया

COVID 19 Vaccine: लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

कोरोनाची लस देताना सामान्य-व्हीआयपी असा भेदभाव करु नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा : अरविंद केजरीवाल

कोरोनाच्या लशीबाबात भीती बाळगू नका; केंद्र सरकारनं परवानगी दिली मी आत्ता लगेच लस घेईन: राजेश टोपे

(Health workers infected with coronavirus after taking covid vaccine)