Rupali Chakankar : केतकी चितळेंसारख्या प्रवृत्तीचे समर्थन करणारी कीड समाजातून वेळीच ठेचून काढली पाहिजे – रुपाली चाकणकर

केतकी चितळेंवर कारवाई केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केतकीच्या पोस्टवरही अश्लील कमेंट करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करण्यात यावी सर्वांसाठी कायदा सामना असावा असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही रुपाली चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'पोलीस व्यवस्थित काम करतायत त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही' असे म्हणत चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Rupali Chakankar : केतकी चितळेंसारख्या प्रवृत्तीचे समर्थन करणारी कीड समाजातून वेळीच ठेचून काढली पाहिजे - रुपाली चाकणकर
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 5:41 PM

नाशिक – अभिनेत्री केतकी चितळेंसारख्या प्रवृत्तीना समर्थन देणाऱ्या काही प्रवृत्ती आजही समाजात आहेत. अशी कीड समाजातून वेळीच ठेचून काढली पाहिजे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar)यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार (Sharad Pawar )साहेबांकडे गुरुतुल्य व्यक्तीमत्व म्हणून महाराष्ट्र बघतो. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणारी ही किड असून ति ठेचून काढली पाहिजे. केतकी चितळेला समर्थन देणारी ही किडच एक सारख्या विचारांची आहे. अशी खोचक टीका रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर केली आहे. शांत महाराष्ट्र अशांत करण्याचं विरोधकांचे काम सुरु आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत. नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित असताना चाकणकर यांनी पत्रकारांच्या सोबत संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

पोलीस त्याचे काम करतायत

केतकी चितळेंवर कारवाई केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केतकीच्या पोस्टवरही अश्लील कमेंट करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करण्यात यावी सर्वांसाठी कायदा सामना असावा असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही रुपाली चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘पोलीस व्यवस्थित काम करतायत त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही’ असे म्हणत चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. केतकीच्या पोस्टनंतर महिला आयोगाकडे मेलद्वारे अनेक तक्रारी आल्या ज्या विभागातून तक्रारी आल्या तिथल्या पोलिसांना महिला आयोगाकडून कारवाई बाबत निर्देश दिले आहेत. असेही त्या म्हणाल्या आहेत.

तृप्ती देसाईवर टीका

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळेंने शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत तिचे समर्थन केले होते. तसेच न्यायालया तिने स्वतःचीच बाजू मांडलेलया धाडसाचे कौतुक केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनीही तिचे समर्थन केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.