AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकः शेळ्यां, वासरावर ताव मारणारा बिबट्या जेरबंद…नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास…महिनाभरात तीन बिबटे पिंजऱ्यात

नाशिक (nashik) जिल्ह्यातल्या मालेगाव (Malegaon) जवळच्या वडगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

नाशिकः शेळ्यां, वासरावर ताव मारणारा बिबट्या जेरबंद...नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...महिनाभरात तीन बिबटे पिंजऱ्यात
नाशिकमध्ये वडगाव परिसरात बिबट्याला पकडण्यात आले.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 21, 2021 | 5:36 PM
Share

नाशिकः नाशिक (nashik) जिल्ह्यातल्या मालेगाव (Malegaon) जवळच्या वडगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Leopard caught in Nashik, relief to citizens)

वडगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. बिबट्याने 10 सप्टेंबर रोजी एका शेतातील गाईच्या वासरावर ताव मारला होता. त्यानंतर तो परिसरात अनेक ठिकाणी दिसून आला. बिबट्याने टाकेदवेगाव परिसरातील येल्याचीमेट शिवारात दोन मेंढपाळांच्या दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. गेल्या चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. हे मेंढपाळ शेळ्या चारण्यासाठी रानात गेले होते. त्यांना घराकडे परतायला उशीर झाला. गावी येताना थोडा अंधारही पडला होता. नेमक्या याच यावेळी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढवला. मेंढपाळांनी शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून धाव घेतली. बिबट्यावर दगडांचा मारा करून पिटाळून लावले. मात्र, जखमी झालेल्या शेळीने जीव सोडला. बिबट्याच्या वावराने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मशागतीच्या कामासाठी शेतात जायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या भेट घेत, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. मंत्र्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना परिसरात पिंजरा लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर वनविभागाने वडगाव परिसरात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्या सापडला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाआहे.

एकापाठोपाठ एक…

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू होता. त्यापैकी एका बिबट्यासाठी बेलगाव कुऱ्हे येथील एका पोल्ट्री शेडजवळ नुकतेच पकडण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसात याच परिसरात दुसरा बिबट्याही पकडण्यात आला होता. या नंतर पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले होते. आता वडगाव परिसरात हा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा

बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत. (Leopard caught in Nashik, relief to citizens)

इतर बातम्याः

नाशिकः सांडपाण्यात वाहून गेला अन् नाल्याच्या जाळीत अडकला…गंगाघाटावर पोहणे पडले महागात

चंचल वारा, या जलधारा…नाशिकमध्ये ऊन-पावसाचा खेळ…पुढचे दोन दिवस सोहळा!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या