गाडीतून रस्त्यावर पडले दारूचे बॉक्स, तळीरामांची बॉटल्स गोळा करण्यासाठी धावपळ

| Updated on: May 29, 2023 | 5:10 AM

वाहन चालकाच्या नंतर ही बाब लक्षात आली. तोपर्यंत दारूच्या बॉटल्स लोकांनी गहाळ केल्या होत्या. लूट सको तो लूट लो, अशी काहीही अवस्था या दारूच्या बॉटल्स पाहून झाली.

गाडीतून रस्त्यावर पडले दारूचे बॉक्स, तळीरामांची बॉटल्स गोळा करण्यासाठी धावपळ
Follow us on

उमेश पारीक, प्रतिनिधी, लासलगाव (नाशिक) : रस्त्यावर अपघात होत असतात. वस्तू खाली पडल्या की, काही लोकं त्या उचतात. समजा कांद्याचा ट्रक पलटला तर कांदे काही लोकं चोरून नेतात. शक्य तितके उचतात. कारण अपघातानंतर चालक पसार होतो. अशीच एक घटना येवला तालुक्यात घडली. चक्क दारू वाहून नेणाऱ्या वाहनातून दारूचे बॉक्स पडले. मग, दारूच्या बॉटल्स उचलण्यासाठी लोकांची गर्दी झाली. तळीरामांनी दारूच्या बॉटल्स उचलण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर लहान मुलं-मुलीही दारूच्या बॉटल्स गोळा करू लागले. ज्यांना – ज्यांना शक्य झालं त्यांनी या दारूच्या बॉटल्स घरी नेल्या. वाहन चालकाच्या नंतर ही बाब लक्षात आली. तोपर्यंत दारूच्या बॉटल्स लोकांनी गहाळ केल्या होत्या. लूट शको तो लूट लो, अशी काहीही अवस्था या दारूच्या बॉटल्स पाहून झाली.

गाडीतून पडल्या दारूच्या बॉटल्स

गाडीतून पडलेल्या दारूच्या बॉक्समधून तळीरामांनी बॉटल्या चोरून नेल्या. बॉटल्या घेऊन जाणाऱ्यांमध्ये लहान मुली, मुले आणि महिलांचादेखील समावेश आहे. हातात मिळेल तेवढ्या बॉटल्या या तळीरामानी लंपास केल्या.

 

हे सुद्धा वाचा

दारूच्या बॉटल्स नेण्यासाठी तळीरामांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर मार्गांवरून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या वाहनातून काही बॉक्स येवला तालुक्यातील पुरणगाव येथे खाली पडले. त्यानंतर दारूच्या बॉटल्या लंपास करण्यासाठी तळीरामांची झुंबड उडाली. ही घटना येवल्यात घडली.

 

महिलांनीही उचलल्या दारूच्या बॉटल्स

धक्कादायक म्हणजे दारूच्या बॉटल्या लंपास करण्यामध्ये लहान मुली, मुले आणि महिलांचादेखील समावेश होता. महामार्गावरून धावणाऱ्या एखादा वाहनाखाली येऊन अपघात होऊ शकतो, याची देखील कोणी फिकीर करत नव्हता.

त्याठिकाणी काच पडले होते. पण, त्याची कुणाला पर्वा नव्हती. उठा शको उतणी उठा लो, अशी काहीसी परिस्थिती या मद्यपींची होती.