भोंदूबाबाबाला २ हजार दिले, पण बायको परत आली नाही मग संतप्त झालेल्या पतीने…

विनोद आणि भिवा हे दोघेही एकाच गावातील आहेत. ते एकमेकांना ओळखत होते. अधूनमधून या दोघांत दारूच्या पार्ट्या होत होत्या.

भोंदूबाबाबाला २ हजार दिले, पण बायको परत आली नाही मग संतप्त झालेल्या पतीने...
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 8:33 PM

प्रतिनिधी, पालघर : विनोद बसवंत (वय ३५) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. भिवा वायडा (वय ७५) हा मांडवी, उसगाव, भाताने, पारोळसह आजूबाजूच्या गावात जागरण, गोंधळ घालण्याचे काम करीत होता. विनोदने 5 वर्षांपूर्वी पैशासाठी एकाची हत्या केली. त्यानंतर तो 3 वर्षे जेलमध्ये होता. याच काळात त्याची बायको त्याला सोडून गेली होती. पण कोरोना काळात आरोपी हा पे रोलवर सुटून आला. पण त्याची बायको परत आली नाही.

विनोद आणि भिवा हे दोघेही एकाच गावातील आहेत. ते एकमेकांना ओळखत होते. अधूनमधून या दोघांत दारूच्या पार्ट्या होत होत्या. सोडून गेलेली बायको ही परत यावी यासाठी विनोद प्रयत्न करीत होता. त्यावेळी भिवा हा भोंदूबाबा जाणता (भगत) असल्याने त्याने मी देवी देवतांसमोर पूजा करून तुझी बायको परत आणून देतो असे सांगितले. विनोदकडून दोन हजार घेतले होते.

एकत्र प्यायचे दारू

काही दिवस संपल्यानंतर बायको काही परत येतच नाही. यामुळे विनोदला भिवाचा राग आला होता. हे सुरू असतानाच 24 मे रोजी पुन्हा विनोद आणि भिवा एकत्र दारू पिण्यासाठी बसले. पैसे दिले पण बायको आलीच नाही, अशी दोघात चर्चा झाली.

हे सुद्धा वाचा

आणखी एक विधी करावा लागेल

पुन्हा आणखी एक विधी करावी लागेल. त्यासाठी पुन्हा तीन हजार लागतील, असे जाणत्या भोंदूबाबाने विनोदला सांगितले. संतापलेल्या विनोदने उसगावच्या देसाईवाडी परिसरात सिमेंटचा दगड उचलला. भोंदुबाबाच्या डोक्यात घालून निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला होता.

हत्या करून फेकलेला मृतदेह मांडवी पोलिसांना मिळाला होता. मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी घटनास्थळावर भेट दिली. त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरणचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तीन पथक तयार केली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला विनोद

आरोपींच्या तपासासाठी रवाना केले. एका पथकाने परिसरातील सीसीटीव्ही, दुसऱ्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि तिसऱ्या पथकाने फिल्डवर असा तिघांनी समांतर तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विनोद दिसून आला.

विनोदचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.