लंगून नावाचे वानर १० वर्षे गावात राहिले, गेले तेव्हा सारे गाव हळहळले; इतक्या दिवसांचा दुखवटा

| Updated on: Mar 19, 2023 | 8:48 AM

या गावात एक वानर राहत होते. ते वानर गावातील एक सदस्यचं झाले होते. त्याने कधी कुणाला इजा पोहचवली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा तो चाहता झाला.

लंगून नावाचे वानर १० वर्षे गावात राहिले, गेले तेव्हा सारे गाव हळहळले; इतक्या दिवसांचा दुखवटा
Follow us on

नाशिक : जीव हा शेवटी जीव असतो. तो जनावर असो की माणूस. प्राण्यांमध्येही आपुलकी, जिव्हाळा, प्रेम पाहायला मिळते. याचा प्रत्येक मालेगाव तालुक्यातील टेहेरे गावात आला. या गावात एक वानर राहत होते. ते वानर गावातील एक सदस्यचं झाले होते. त्याने कधी कुणाला इजा पोहचवली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा तो चाहता झाला. गेल्या दहा वर्षांपासून हे सर्व सुरू होते. तो म्हातारा झाला होता. त्यामुळे त्याची तब्यत बरी राहत नव्हती. शेवटी त्याचे निधन झाले. या निधनाने सारे गाव हळहळले.

दहा दिवसांचा दुखवटा

गावकऱ्यांनी या वानराचे अंत्यसंस्कार करायचे ठरवले. धार्मिक विधी पार पाडण्यात आले. अंत्ययात्रा काढण्यात आली. या यात्रेत गावकरी सहभागी झाले होते. गावातील एखादा प्रतिष्ठित व्यक्ती गेल्यावर जसा अंत्यसंस्कार करण्यात येतो तसा गावात अंत्यविधी पार पाडण्यात आला. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी दहा दिवस गावात दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

दहा वर्षांपासून राहत होता गावात

मालेगाव तालुक्यातील टेहेरे गावात अनेक दिवसापासून एक वानर राहत होते. लंगुर जातीचा हा वानर 10 वर्षापासून गावात राहत असल्याने संपूर्ण गावाला त्याची सवयच झाली होती. गावकऱ्यांनी भरभरून जीव लावल्याने गावकऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाने जणू गावाचा रहिवाशीच झाला होता.

अनेकांना अश्रू अनावर

अचानक त्याची तब्बेत बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या मृत्यूने गाव अक्षरशः हळहळले. संपूर्ण गावाने एकत्रित येत त्याच्या विधिवत पूजा करण्यात आली. अंत्ययात्रादेखील काढून अंत्यसंस्कार केलेत. अंत्यविधी करताना अनेकांना अश्रू अनावर झाले. वानराच्या निधनाने गावकऱ्यांना रडू आले. आता शोकाकुल गावकऱ्यांनी चक्का दहा दिवसांचा दुखवटा जाहीर केला. एवढा जिव्हाळा मुक्या प्राण्याप्रती बघायला मिळाला.

यानिमित्ताने सारे गाव एकत्र आले. काहींच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. एखादा घरचा व्यक्ती जावा, अशी परिस्थिती गावात झाली होती. सारे वानराच्या आठवणीत रमले होते. वानराने त्यांच्याशी कशाप्रकारे वागणूक दिली, याची आठवण लोकं काढत होते.