Nashik | नाशिकच्या चाडेगाव शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निःश्वास

| Updated on: Aug 24, 2022 | 10:31 AM

चाडेगाव शिवारात एक बिबट्या चांगलाच धुमाकूळ घालत होता. अनेक प्रयत्न वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी केले. मात्र, बिबट्या काही वन विभागाच्या हाताला लागत नव्हता. शेवटी वन विभागाला हा बिबट्या पकडण्यात यश मिळालंय.

Nashik | नाशिकच्या चाडेगाव शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निःश्वास
Follow us on

नाशिक : नाशिकच्या (Nashik) चाडेगाव शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वन विभागाल यश मिळालंय. गेल्या अनेक दिवसांपासून चाडेगाव शिवारात या बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या भीतीने लोक रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर निघणे देखील टाळत होते. कधी शेतात तर कधी विहिरीच्याजवळ हा बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वन विभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतलायं.

बिबट्याला पकडण्यास अखेर वन विभागाला मिळाले यश

चाडेगाव शिवारात एक बिबट्या चांगलाच धुमाकूळ घालत होता. अनेक प्रयत्न वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी केले. मात्र, बिबट्या काही वन विभागाच्या हाताला लागत नव्हता. शेवटी वन विभागाला हा बिबट्या पकडण्यात यश मिळालंय. विशेष म्हणजे हा बिबट्या 10 वर्ष वयाचा असल्याची देखील माहिती पुढे येते आहे. वन विभागाने आतापर्यंत पकडलेला हा सर्वात मोठा बिबट्या असल्याचे देखील सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

पकडण्यात आलेले बिबट्या 10 वर्ष वयाचा असल्याची प्राथमिक माहिती

वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झालायं. वन विभागाने बिबट्याला पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकलायं. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने परिसरात मोठा धुमाकूळ घातला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. हा बिबट्या लोकवस्तीमध्ये देखील दिसून येत होता. आतापर्यंत पकडण्यात आलेला सर्वात मोठा हा बिबट्या असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळते आहे.