AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident News : नाशिक-गुजरात हायवेवर खाजगी बसचा भीषण अपघात, बस 200 फूट खोल दरीत कोसळली

Accident News : नाशिक-गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण की. बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले.

Accident News : नाशिक-गुजरात हायवेवर खाजगी बसचा भीषण अपघात, बस 200 फूट खोल दरीत कोसळली
saputara ghat private bus Accident
| Updated on: Feb 02, 2025 | 11:10 AM
Share

नाशिक-गुजरात हायवेवर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात हा अपघात झाला. एका खाजगी लक्झरी प्रवासी बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले, तर 15 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण की, बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले. अपघातस्थळी आता मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी नाशिकहून देवदर्शन आटोपून गुजरातकडे देवदर्शनासाठी चालले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत.

इतक्या भीषण अपघाताच कारण काय?

इतका भीषण अपघात नेमका कशामुळे झाला? ते अजून समजू शकलेलं नाही. बस चालकाच स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची एक प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक भागात खासकरुन घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात धुकं असतं. त्यामुळे सुद्धा हा अपघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्रूझर गाडी कालव्यात कोसळली

कालच हरियाणामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला होता. पंजाबमध्ये लग्न सोहळा आटोपून गावकरी घरी परतत असताना क्रूझर गाडी कालव्यात कोसळली. हा सुद्धा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर 10 बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु होता.

ड्रायव्हर दारु पिऊन बस चालवत होता का?

सापुतारा अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळावर बचाव कार्य पूर्ण झालं आहे. दरीत कोसळलेल्या बसमधील जखमींना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जवळील रुग्णालयांमध्ये केलं दाखल. शिर्डी, त्र्यंबकेश्वर नाशिक वरून देवदर्शन करून परतत असताना गुजरात महामार्गावर असलेल्या सापुतारा जवळ दरीत बस कोसळली. प्रवाशांच्या चार पैकी एक बसला अपघात झाल्याची गुजरात पोलिसांची माहिती. बस चालकाने दारू पिल्यामुळे अपघात झाल्याचे बसमधील प्रवाशांचे म्हणणे आहे. दारू पिल्यानंतर बस थांबवण्याची केली होती विनंती.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर हायवा ट्रक आणि vaganr कारचा भीषण अपघात

वसई हद्दीत सातीवली खिंड येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला असून vaganar कार चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हायवा ट्रक vaganar कार महामार्गावर पलटी झाली असल्याने काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी विस्कळीत झाली होती. वालीव आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहनचालकांना मदत केली. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...