Nashik Health: नाशिक जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या 32 नव्या रुग्णवाहिका; कोठे होणार सोय?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने नाशिककरांना जर्जर केले होते. ग्रामीण भागातही या लाटेचे तडाखे जाणवले. यावेळी गंभीर रुग्णांच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवला. हे पाहता या वित्त आयोग व्याजाच्या निधीतून ग्रामीण भागासाठी नव्या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे.

Nashik Health: नाशिक जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या 32 नव्या रुग्णवाहिका; कोठे होणार सोय?
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले.
| Updated on: Apr 16, 2022 | 11:42 AM

नाशिकः कोरोनाच्या (Corona) काळात रुग्णवाहिकांची असलेली कमतरता बघता ग्रामीण भागातील रुग्णसेवेच्या हेतूने नाशिक जिल्हा परिषदेच्या 14 व्या वित्त आयोग व्याजाच्या निधीतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण 32 रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. यातील राजापूर, भारम व सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Center) नूतन रुग्णवाहिकांचे वितरण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, भाऊसाहेब भवर, दीपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे,गटविकास अधिकारी अन्सार शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील देसाई, राजापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोठे मिळाल्या रुग्णवाहिका?

जिल्हा परिषदेच्या वित्त आयोग व्याजाच्या निधीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण या रुग्णवाहिका वितरित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील बोरगाव , बुबळी, नाशिक तालुक्यातील जातेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवड, इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे, पेठ तालुक्यातील कोहर, दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव , तळेगाव दि. वरखेडा, कळवण तालुक्यातील ति-हळ, निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे, सिन्नर तालुक्यातील दापुर , देवपुर , वावी, देवळा तालुक्यातील लोहणेर , खामखेडा, सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव , जायखेडा , निरपुर , (साल्हेर), मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण , रावळगाव , निमगाव , वडनेर खकुर्डी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही , उसवाड, नांदगाव तालुक्यातील वेहळगाव , हिसवळ , पिंपरखेड तर येवला तालुक्यातील भारम , राजापुर , सावरगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या आहेत.

कोरोनात मोठे हाल

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने नाशिककरांना जर्जर केले होते. विशेषतः दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या सिलिंडरसाठी रस्त्यावर रांगा लावाव्या लागल्या. ग्रामीण भागातही या लाटेचे तडाखे जाणवले. यावेळी गंभीर रुग्णांच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवला. हे पाहता या वित्त आयोग व्याजाच्या निधीतून ग्रामीण भागासाठी नव्या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागात याचा मोठा उपयोग होणार आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!