
आज नाशिक भाजपमध्ये मेगा पक्ष प्रवेश सोहळा रंगणार होता. तीन नगरसेवकांसह इतर पदाधिकारी या सोहळ्यात भाजपाच्या केशरी रंगात न्हाऊन निघणार होते. कालच या पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी सुरू होती. पण उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केले. त्यातून त्यांनी जो निशाणा साधला. त्याचे पडसाद लागलीच नाशकात दिसले. राऊतांच्या त्या ट्वीटमुळे भाजप पक्ष प्रवेशाला ब्रेक लागला. तर माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, गणेश गिते सह अनेक माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.
बागूल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक
संजय राऊत यांच्या एक्स पोस्टनंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागला. बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशकात गंभीर गुन्हा दाखल होता. भाजपावर टीका होऊ लागल्याने प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती समोर येत आहे. आज मुंबईत भाजपाच्या पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश होणार होता.
मामा राजवाडे यांची ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झाली होती. त्यांच्यासोबत उपनेते सुनिल बागुल, गणेश गीते, सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, कमलेश बोडके, बाळासाहेब पाठक, गुलाब भोये, कन्नू ताजने, शंभु बागुल, अजय बागुल यांचा पक्ष प्रवेश होणार होता.
संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
नाशिक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत संजय राऊतांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली. भाजपची ही गंमत आहे. भाजप उद्या दाऊदलाही त्यांच्या पक्षात अशा पद्धतीने घेईल. चार दिवसांपूर्वी आमच्या लोकांवर नाशिकच्या गुन्हा दाखल केला. गुन्हा का तर नाशिकची एक व्यक्ती सोशल मीडियावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते. खोट्या बातम्या देऊन ब्लॅकमेल करते. त्या बदल्यात आर्थिक मागणी करते. हे वारंवार झाल्याने शिवसैनिकांनी त्याच्या घरात जाऊन धक्काबुक्की केली असं म्हणतात. हे भाजपने केलं त्यांच्या नेत्यांच्या बाबत, इतर पक्षानेही केलं आहे. नवीन नाही. सोशल मीडियावर बदनामी झाल्यावर जाब विचारला. हा ३०७, विनयभंग खुनाचा प्रयत्न असा गुन्हा नाही. पण पोलिसांनी गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून गंभीर स्वरुपाचे गुन्हे लावले. खुनाचा प्रयत्न, रॉबरी या कलमातंर्गत गुन्हे दाखल झाले.
हे लोकं अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात गेले. चार दिवस पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी फरार झाले. म्हणजे भाजपच्या भाषेत फरार झाले. पोलिसांनी यांना जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न केले. हे फरार गुन्हेगार आज भाजपात गिरीश महाजन यांच्या उपस्थित सामील होतात. पोलिसांना मिळत नाही. पण मंत्र्याकडे येतात. ही भाजपची गंमत आहे.
बडगुजर यांच्याबाबतही तेच झाले. या चार लोकांबाबतही तेच झालं. तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारलं पाहिजे. सत्तेचा वापर आणि पोलिसांचा वापर केला जात आहे. पोलीस आयुक्तांना सवाल आहे. तुम्ही काय कारवाई करतात. भंपक पोलीस अधिकारी युनिफॉर्मचा अपमान करत आहे. मंत्र्याच्या बंगल्यावर सोहळा होतोय. फडणवीस यांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल तर मंत्र्याची हकालपट्टी केली
पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली.
चार दहशतवादी सुद्धा भाजपात जातील
पहलगामचे चार अतिरेकीही महाराष्ट्रात येतील. वर्षा बंगल्यात येतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील. हे भाजपचं कॅरेक्टर आहे. सीमा हिरे भाजपच्या आमदार. त्यांनी काल विधानसभेत प्रश्न विचारला. अभ्यास करा. भाजपमध्ये चारित्र्य संपन्न लोकांना स्थान नाही,. बलात्कार, चोऱ्या गुन्हे असल्याचं सर्टिफेकट घेऊन या भाजपमध्ये प्रवेश मिळतो. ही डी गँग आहे. भाजपची डी गँग झाली. डी गँग म्हणजे डरपोक गँग आहे, अशी खोचक टीका राऊतांनी केली.