AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशकात ठाकरे गटाला झटका; नगरसेवकांचा भाजपात आज मेगा प्रवेश सोहळा

Nashik Thackeray Group, BJP : सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आणि आता ही यादी वाढतच चालली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत. आज ठाकरे गटाच्या नगरसेवक, पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये मेगा प्रवेश सोहळा होत आहे.

नाशकात ठाकरे गटाला झटका; नगरसेवकांचा भाजपात आज मेगा प्रवेश सोहळा
नाशकात मोठा खेला Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jul 03, 2025 | 9:41 AM
Share

नाशकात महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदे सेना आणि भाजपाने अर्धी लढाई जिंकल्याचे बोलले जात आहे. ठाकरे सेनेला एका पाठोपाठ एक धक्के देण्यात या दोन्ही पक्षांनी कोणतीच कमी सोडलेली नाही. ठाकरे सेनेने काही दिवसांपूर्वी निर्धार शिबिर घेतले होते. पण त्यावेळी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी पक्ष संपवण्याचा तर निर्धार केला नव्हता ना, अशी खमंग चर्चा रंगली आहे. ठाकरे सेनेला गळती लागली आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आणि आता ही यादी वाढतच चालली आहे. शिंदे सेनेनंतर भाजपाने पण ठाकरे गटाला खिंडार पाडण्यात यश मिळवले आहे. आज ठाकरे गटाच्या नगरसेवक, पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये मेगा प्रवेश सोहळा होत आहे.

नवनियुक्त महानगर प्रमुखांचा जय महाराष्ट्र

नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला पुन्हा हादरा बसला. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर आता नवनियुक्त महानगर प्रमुखही पक्ष सोडणार आहेत. ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख मामा राजवाडे भाजपत प्रवेश करणार आहेत. आठवडाभरापूर्वीच मामा राजवाडेंची महानगर प्रमुख पदी नियुक्ती झाली होती. तर नाशिकमधील तीन नगरसेवक आज भाजपात प्रवेश करत आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल मिळाला. त्यामुळे भाजपात इनकमिंग वाढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाल्याने पक्षांतराचा वेग वाढला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशावेळी मोठा गदारोळ दिसला होता. पण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रचंड विरोध असतानाही बडगुजर यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यांच्या पाठोपाठ आता इच्छुकांची रीघ लागली आहे. स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात आल्याने आता इतर पक्षातील नेते, पदाधिकार्‍यांना होणारा विरोध मावळला आहे.

आज करणार भाजपात प्रवेश

१) सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा )

२) मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा )

३) गणेश गीते ( मा. स्थायी समिति सभापती )

३) सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, मा. नगरसेवक, उबाठा )

४) प्रशांत दिवे ( मा. नागरसेवक, उबाठा )

५) सिमा ताजने ( मा. नगरसेविका,उबाठा )

६) कमलेश बोडके ( मा. नगरसेवक )

७) बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा )

८) गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )

९) कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )

९) शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा )

१०) अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख )

ही भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल

भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधीकाऱ्यांवर आधी गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात गेले. पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. या सगळ्यांचा क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार (भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत. भारतीय जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी या पक्ष प्रवेशावर केला आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.