AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये शिवसेनेने काढली सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; निषेधाची तिरडी, अनोख्या रडारडीची चर्चा!

आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी 58 कोटी रुपये हडपल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याच प्रकरणी सोमय्यांचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले.

नाशिकमध्ये शिवसेनेने काढली सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; निषेधाची तिरडी, अनोख्या रडारडीची चर्चा!
नाशिकमध्ये किरीट सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शिवसेने आंदोलन केले.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 07, 2022 | 3:59 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) गुरुवारी शिवसेनेने (Shivsena) केलेले एक अनोखे आंदोलन आणि रडारडी चांगलीच चर्चेत राहिली. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील कलगीतुरा आता टिपेला पोहचला आहे. राऊत यांच्या मालमत्तांवर टाच आणल्यानंतर ते चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी नुकतीच सोमय्यांना कशी लाखोली वाहिली ते उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवरून बीप-बीप करून ऐकले. तितकाच टोकाचा विरोध आता शिवसैनिकही करतायत. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी 58 कोटी रुपये हडपल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याच प्रकरणी सोमय्यांचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले.

निषेधाची बांधली तिरडी….

नाशिकमधील शालिमार भागात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. येथेच सोमय्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यासाठी एक तिरडी बांधण्यात आली. गाडग्यात पेटलेल्या गोवऱ्या ठेवून शिकाळे तयार करण्यात आले. प्रतिकात्मक अंत्ययात्रेची सारी तयारी झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी धाय मोकलून उर पिटून मोठ्याने रडारडी केली. ही अचानक सुरू झालेली रडारडी पाहून रस्त्यावरून जा-ये करणारे अनेक पादचारी आणि वाहनचालक क्षणभर थबकले. खरेच कोणी गेले की काय, याचीही अनेकांनी चौकशी केली. मात्र, हे आंदोलन असल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा निश्वासही सोडला. मात्र, या आंदोलनाची चांगलीच चर्चा यावेळी झाली.

सोमय्यांच्या अटकेची मागणी

आयएनएस विक्रांतप्रकरणी जमविलेला निधी हडपल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे या आंदोलनाला महिला आंदोलकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिवसेनेच्या वतीने आज राज्यभर सोमय्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. आता भाजप याप्रकरणी काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

निवडणुका तोंडावर…

नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. सध्या येथे भाजपची सत्ता होती. आता येणाऱ्या निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटताना दिसत आहेत. इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?