AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इयत्ता 9वीत शिकत असलेल्या मुलीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील खळबळजनक प्रकरण समोर

नाशिकमध्ये एका आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला आहे. या घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

इयत्ता 9वीत शिकत असलेल्या मुलीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील खळबळजनक प्रकरण समोर
नाशिकImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 10, 2026 | 1:19 PM
Share

राज्यात महिलांवर अत्याचार होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे तर कधी एखाद्या महिलेचा तिच्या पतीने जीव घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता नाशिकमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एक अल्पवयीन मुलीने आश्रम शाळेतच बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभर खळबळ उडाली आहे. ही घटना मोहनदरी आदिवासी आश्रम शाळेत घडली असून, अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एक अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहात पाठवले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न

या घटनेमुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेखी आणि आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आश्रम शाळेत नियमित आरोग्य तपासणी होत असताना एवढी गंभीर बाब इतके दिवस कशी लक्षात आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, प्रकरणाची खाते अंतर्गत सखोल तपासणी सुरू केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली होती.

या घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक स्तरावर होत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ