
नाशिकमध्ये सुविचार गौरव पुरस्कार सोहळा झाला. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे रसिकांचे धमाल मनोरंजन झाले.

सुविचार गौरव सोहळ्यात रॅम्प वॉकने रसिकांची मने जिंकली. अनेक तरुण-तरुणींनी आपल्या बेधडक अंदाजात साऱ्यांना भुरळ घातली.

सोहळ्याला मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, सुविचार मंचचे अध्यक्ष अशोक खुटाडे, सचिव अॅड. रवींद्र पगार, संयोजक आकाश पगार उपस्थित होते.

नाशिकमधील मानाचा पुरस्कार म्हणून सुविचार गौरवची ख्याती आहे. या पुरस्काराने अनेक मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.

नाशिकमधील सांस्कृतिक क्षेत्रात सुविचार गौरव पुरस्काराने मोलाची भर घातली आहे. अनेक कलावंतांना त्यामुळे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे ऐनवेळी सुविचार गौरव पुरस्कार सोहळ्याच्या तारखा बदलण्यात आल्या. त्यानंतरही झालेल्या कार्यक्रमाला रसिकांनी तुडूंब गर्दी केली.

सोहळ्यात सामूहिक नृत्याने धमाल आणली. पायाला भिंगरी लागल्यात थिरकणारे कलावंत पाहून प्रेक्षकांनी सभागृह डोक्यावर घेतले.

सुविचार गौरव सोहळ्यात सादर झालेल्या गीतांनाही रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. अनेक गीतांना वन्समोरच्या कौतुकाची थाप मिळाली.