अमेरिकन सिनेमा आणि नाशिकच्या पिवळ्या पाण्याचं कनेक्शन काय? 20 हजार लोकांचा जीव…

शिकमधील अंबड येथील बोअरवेलमधून पिवळे व दूषित पाणी येत आहे, ज्यात क्रोमियमचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा १००० पटीने अधिक आहे. यामुळे २० हजार नागरिकांना त्वचेचे विकार आणि आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हा प्रश्न अमेरिकन सिनेमा 'एरिंन ब्रोकोविच' मधील भूजल प्रदूषणाच्या सत्य घटनेसारखाच असून, या गंभीर समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अमेरिकन सिनेमा आणि नाशिकच्या पिवळ्या पाण्याचं कनेक्शन काय? 20 हजार लोकांचा जीव...
Yellow water
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 4:02 PM

राज्यात दुष्काळ निर्माण झाला असून अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी दिवसाआड पाणी येत आहे. नाशिकच्या अंबड परिसरात बोअरमधून पाणी येत आहे. पण हे पाणी पिण्या योग्य नाहीये. बोअरमधून चक्क पिवळं पाणी येत आहे. त्यामुळे नाशिकमधील एक दोन नव्हे तर 20 हजार नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

नाशिकमधील अंबड परिसरातील दत्तनगरमध्ये बोअरवेलमधून पिवळ्या रंगाचं पाणी येत आहे. पाण्यात विषारी क्रोमियमचे धक्कादायक प्रमाण आढळले आहे. तपासणीत क्रोमियमचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा 1,000 पटींहून अधिक आहे. या पाण्याच्या वापरामुळे नागरिकांना त्वचेचे विकार आणि जखमांचा त्रास सुरू झाला आहे. दूषित पाणी नाल्यावाटे गोदावरीत मिसळत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

Loading...

नोटीस देऊन चालणार नाही

एमपीसीबीकडून एका कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. मात्र, केवळ नोटीस देऊन भागणार नाही. या कंपनीवर कठोर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दत्तनगरमधील दूषित बोअरवेल बंद करून तातडीने टँकरने सुरक्षित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोशन केदार यांनी केली आहे.

पिवळ्या पाण्याचा सिनेमाशी संबंध?

दत्तनगरमधील 20 हजार लोक या पाण्याचा वापर करत आहेत. त्यांना त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. हे पाणी प्रयोगशाळेत तपासण्यात आलंय. त्यात एक्झाव्हॅलंट क्रोमियम रसायन आढळून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, हे रसायन अत्यंत घातक आहे. नाशिकच्या या पिवळ्या पाण्याचा थेट अमेरिकन सिनेमा ‘एरिन ब्रोकोविच’शी जोडला जात आहे. ‘एरिन ब्रोकोविच’ या सिनेमात जुलिया रॉबर्टने ज्या महिलेची भूमिका साकारली, ती महिला एका गावात पाण्यात हेच रसायन उभारण्याच्या विरोधात एक लढा उभारते. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत होता.

अमेरिकेच्या हिंकले गावात अशाच प्रकारचं भूजल प्रदूषणाचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने लढा उभारला गेला होता. या लढ्याला यशही आलं. त्यामुळे कंपनीला 33 कोटी डॉलरची नुकसान भरपाई तिथल्या लोकांना द्यावी लागली होती. आता नाशिकचं दत्तनगर हे सुद्धा दुसरं हिंकले गाव झालं आहे. या गावातील पाण्यातही घातक रसायन सापडलं आहे. पण या गावाला गरज आहे ती एका ज्युलिया रॉबर्टची.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us