VIDEO : नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा धसका, पंपावरील वाहन चालकांची तारांबळ कॅमेरात कैद

| Updated on: Aug 17, 2021 | 9:04 PM

नाशिक जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' मोहिम सुरू केली. मात्र, हेल्मेट सक्तीला केराची टोपली दाखवणारे काही नाशिककर पेट्रोल भरण्यापुरतं दुसऱ्याचं हेल्मेट वापरत असल्याचं दिसलंय.

VIDEO : नाशिकमध्ये नो हेल्मेट, नो पेट्रोलचा धसका, पंपावरील वाहन चालकांची तारांबळ कॅमेरात कैद
Follow us on

नाशिक : पोलिसांच्या ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भारतीय लोक ‘जुगाड’ करण्यात पुढे असल्याची अनेक उदाहरणं आपण कायमच पाहतो, मात्र जीवाच्या संरक्षणासाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हेल्मेट वापरातही हाच जुगाड पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिम सुरू केली. मात्र, हेल्मेट सक्तीला केराची टोपली दाखवणारे काही नाशिककर पेट्रोल भरण्यापुरतं दुसऱ्याचं हेल्मेट वापरत असल्याचं दिसलंय. हे करताना मात्र त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

दुसऱ्याच तात्पुरतं हेल्मेट घालून लोक पेट्रोल भरताना कॅमेरात कैद झालेत. नाशिकमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. पंपावर आलेले नागरिक पेट्रोल भरण्यासाठी तात्पुरतं दुसऱ्याचं हेल्मेट घालत असल्यामुळं कोरोना संसर्गाचा धोकाही वाढलाय.

नागरिकांकडून मोहिमेला हरताळ

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांच्या संकल्पनेतून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहिम सुरु करण्यात आली होती. सोमवारी (15 ऑगस्ट) नाशिक शहर आणि परिसरात ही मोहिम राबवण्यास सुरुवात झाली. मात्र मोहिमेला आज काही ठिकाणी नागरिकांनी हरताळ फासल्याचं पाहायला मिळालं.

पेट्रोल पंपावर नागरिक विनाहेल्मेट

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 15 ऑगस्टला या मोहिमेचे उद्घाटन पार पडले. पण सलग पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नो हेल्मेट, नो पेट्रोल या मोहिमेकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिक हे विनाहेल्मेट येऊन पेट्रोल भरताना दिसत आहेत.

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली

विशेष म्हणजे पेट्रोल पंप कर्मचारी देखील विना हेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल देताना पाहायला मिळाले. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या “नो हेल्मेट, नो पेट्रोल ” या मोहिमेला नागरिकांबरोबरच काही पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडूनदेखील केराची टोपली दाखवण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

इतर बातम्या

नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करु; ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री भुजबळांची ग्वाही

भुजबळ म्हणतात, सर सलामत तो हेल्मेट पचास; नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू

People of Nashik using others helmet on Petrol pump after No helmet no petrol mission