अजंग येथील शेतकऱ्याची पंतप्रधानांकडून दखल, शिवाजी डोळे यांनी आधी केली देशाची सेवा आता…

| Updated on: May 29, 2023 | 5:25 AM

ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील आहेत. माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं.

अजंग येथील शेतकऱ्याची पंतप्रधानांकडून दखल, शिवाजी डोळे यांनी आधी केली देशाची सेवा आता...
Follow us on

मनोहर शेवाळे, प्रतिनिधी, मालेगाव : मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शेतकरी शिवाजी डोळे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमामध्ये कौतुक केले आहे. ते माजी सैनिकही आहेत. त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. त्याची महती आता देशभरात गेली आहे. मन की बातमध्ये आज एका अशा व्यक्तीबद्दल, एक अशा संस्थेबद्दल जी जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारही बाबींचे प्रतिबिंब आहे. हे गृहस्थ आहेत महाराष्ट्रातील श्रीमान शिवाजी श्मामराव डोळे. शिवाजी डोळे नाशिक जिल्हयातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील आहेत. माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं.

सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की, कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त कसे योगदान दिलं जावं. आपल्या या मोहिमेत शिवाजी डोळे यांनी २० लोकांची असं एक पथक बनवलं. काही माजी सैनिकांनाही त्यात सामील करून घेतलं.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर त्यांच्या या पथकानं वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन आपल्या हातात घेतलं. ही सहकारी संस्था निष्क्रीय पडून होती. तिचं पुनरूज्जीवन करण्याचा विडा त्यांनी उचलला.

आज पहाता पहाता वेकंटेश्वरा को ऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. तिच्याशी जवळपास १८ हजार लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येने आमचे पूर्व सैनिकही आहेत.

 

नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यांनी सेंद्रीय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे.

आता त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात आहेत. या पथकाची जी दोन प्रमुख वैशिष्ट्यं आहेत, त्यात माझं लक्ष ज्यांनी वेधून घेतली ती आहेत जय विज्ञान आणि जय अनुसंधान. याचे सदस्य तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करत आहेत. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणीकरणावरही ते लक्ष केंद्रित करत आहेत.

सहकारातून समृद्धीच्या भावनेतून काम करणाऱ्या पथकातील लोकांची मी प्रशंसा करतो. या प्रयत्नामुळे केवळ मोठ्या संख्येनं लोकांचं सबलीकरण झालं नाही तर उपजीविकेसाठी अनेक साधनंही तयार झाली आहेत. मला आशा आहे की हा प्रयत्न प्रत्येक श्रोत्याला प्रेरित निश्चित करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं.