पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात जाताना…

पप्पू कलानी यांना एका हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याने भाजपसोबत जवळीक साधली होती.

पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात जाताना...
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 5:59 PM

निनाद करमरकर, प्रतिनिधी, उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगरमधील बलाढ्य कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपात गेला होता. मात्र भाजपचा दबाव असल्यानं आपण जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो. असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचा डॉन आणि उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी सुरुवातीपासून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पप्पू कलानी यांना एका हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याने भाजपसोबत जवळीक साधली होती.

कलानी परिवार राष्ट्रवादीत परतला

टीम ओमी कलानी नावाने संघटना स्थापन करत त्याचे सर्व उमेदवार भाजपच्या चिन्हावर कलानी यांनी उभे केले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच पप्पू कलानी यांची जेलमधून सुटका झाली. भाजपपासून फारकत घेऊन पुन्हा एकदा कलानी परिवार राष्ट्रवादीत आला. यानंतर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी एक वक्तव्य केलं.

हे सुद्धा वाचा

साहेबांच्या परवानगीने भाजपात गेलो

आपण भाजपात जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो. असा खुलासा पंचम कलानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उल्हासनगर शहरात चर्चांना मोठं उधाण आलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता तेव्हाची परिस्थितीच तशी होती की, आपण शरद पवार साहेबांच्या परवानगीने भाजपात गेलो होतो. कारण त्यावेळी काही मोठ्या कौटुंबीक अडचणी होत्या, असं पंचम कलानी म्हणाल्या.

भाजपने कलानी परिवाराला घेताना पप्पू कलानी यांना जेलमधून बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन भाजपने पाळलं नाही. म्हणूनच कलानी परिवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आला. अशीही चर्चा यानंतर उल्हासनगरमध्ये सुरू आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.