AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विधानसभेच्या ज्या जागा भाजपच्या आहेत, तिथे…’; रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?

आगामी विधासभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघांची जबाबदारी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनाही दिली आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरही काही मतदारसंघांची जबाबदारी दिली गेली आहे. यावर रक्षा खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'विधानसभेच्या ज्या जागा भाजपच्या आहेत, तिथे...'; रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?
| Updated on: Sep 01, 2024 | 9:08 PM
Share

आगामी विधानसभा निवडणुकीआधी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील महायुती सरकारमधील पक्षही प्रचारात ताकद लावताना दिसत आहे. आता जागावाटप कशा प्रकारे केले जाते हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे. कारण जागावाटपावरून युतीमध्ये मिठाचा खडा पडला जावू शकतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीव रक्षा खडसे यांच्याकडे नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि नाशिक शहरातील तीन विधानसभांची जबाबदारी दिली आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जागांबाबत काय म्हणाल्या जाणून घ्या.

जिथे भाजपचे आमदार आहेत त्या जागा भाजपकडूनच लढवल्या जातील. महायुती म्हणूनच येणारी निवडणूक लढवू प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. वरिष्ठांनी आदेश दिला आहे, महायुती म्हणून तीन पक्ष सोबत मिळून निवडणूक लढायची आहे. शिंदे गटाचे अजितदादा गटाचे कार्यकर्ते सोबत आहेत सर्व मिळून निवडणुकीला सामोरे जायचे. नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक शहरातील तीन विधानसभांची जबाबदारी दिली आहे. जे आम्ही लोकसभेला अनुभवलं ते काही होऊ नये याची दक्षता आमच्याकडून घेतली जात असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

थोड्याफार फार प्रमाणात मतभेद असतात. घरात चार लोक राहतात मतभेद होतात हा मोठा पक्ष आहे मतभेद होतीलच. ते आमच्याशी चर्चा करतात जेणेकरून आम्ही वरती विषय पोहोचवू शकतो. थोड्याफार अडचणी सगळीकडे असतात. आमदारांवर लोकप्रतिनिधींवर नाराज आहे असं काही नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत असतो. छोट्या मोठ्या विषयांवर चर्चा झाली. सूचना देण्याचे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. उमेदवारी मागणी गुन्हा नाही पक्ष ठरवते कोणाला उमेदवारी द्यायचे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचं असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.

नाथाभाऊंनी लोकसभेला मला पाठिंबा दिला, माझ्यासाठी काम केलं. भारतीय जनता पार्टीत येण्याची इच्छा ही व्यक्त केली. तो नाथाभाऊंचा व्यक्तिगत विषय असल्याचंही रक्षा खडसे यावेळी सांगितलं.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.