AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नाशिक शहरातील खड्ड्यांचा देखावा सादर करा आणि बक्षीस जिंका, आगळ्या- वेगळ्या स्पर्धेचे आयोजन

या सर्व गोष्टींमुळे रस्त्यांवरील खड्डे हा विषय तितकाच महत्त्वाचा आणि चर्चेचा आहे. या खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. खड्डेमुक्त नाशिक व्हावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक शहराच्या वतीने एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आलीयं.

Nashik | नाशिक शहरातील खड्ड्यांचा देखावा सादर करा आणि बक्षीस जिंका, आगळ्या- वेगळ्या स्पर्धेचे आयोजन
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 11:46 AM
Share

नाशिक : नाशिक (Nashik) शहरात पहिल्याच पावसानंतर रस्त्यांचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. शहरातील रस्त्यांचे चाळण झाली असून मोठं मोठे खड्डे रस्त्यावर बघायला मिळतात. इतकेच नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्येही मोठी वाढ झालीयं. तीन वर्षांपूर्वीच महापालिकेने (Municipality) कोट्यावधी रूपये खर्च करून जे रस्ते तयार केले होते, त्या रस्त्यांची देखील दुरावस्था झालीयं. महापालिका आयुक्तांनी देखील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, आता गणेशोत्सवामध्ये नाशिकच्या खराब रस्त्यांवरून एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन (Organized) करण्यात आलयं.

काही काळानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे…

पावसाळा असला की एक विषय सातत्याने गाजत असतो, तो म्हणजे रस्त्यांवरील खड्डे. या खड्डयांवर प्रशासनाने कायमस्वरूपी किंवा तात्पुरते काही उपाय केले तरी काही काळानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. रस्त्यांवरील खड्डे त्यावरून वाहन चालवताना होणारा त्रास, घडणारे अपघात आणि परिणामी गमवावा लागणार जीव यावर नेहमीच शहरात चर्चा केली जाते. आयुक्त कारवाईचे आदेश देतात किंवा फार झाले तर रस्यांची पाहणी करतात. मात्र, नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे काही कमी होत नाहीत.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन

या सर्व गोष्टींमुळे रस्त्यांवरील खड्डे हा विषय तितकाच महत्त्वाचा आणि चर्चेचा आहे. या खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. खड्डेमुक्त नाशिक व्हावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक शहराच्या वतीने एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आलीयं. गणेशोत्सवाच्या कालावधीत जे गणेश मंडळ खड्ड्यांच्या विषयी देखावे सादर करतील, त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.

देखावा आणि फोटो सादर करा आणि बक्षीसे मिळवा

शहरातील नागरिकांनी खड्ड्यांचा फोटो समर्पक शीर्षकासह पाठवावा, असे आवाहन करण्यात आलंय. यातील उत्कृष्ट फोटोला बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या फोटोंचे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. शहरातील खड्ड्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती वाढावी, यासाठी एक लाख सह्यांची मोहीम देखील राबवली जाणार आहे, अशी माहिती नेते राजू देसले यांनी दिलीयं.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर