AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : काँग्रेस पाठोपाठ शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का, मोठा नेता भाजपच्या वाटेवर

Sharad Pawar : महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरु आहे. मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु झालं आहे. काँग्रेसपाठोपाठ आता शरद पवार गटालाही मोठा धक्का बसणार आहे.

Sharad Pawar : काँग्रेस पाठोपाठ शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का, मोठा नेता भाजपच्या वाटेवर
| Updated on: Jul 01, 2025 | 9:15 AM
Share

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे. विधानसभेला महायुतीने घवघवीत यश मिळवलं. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीला पन्नाशीचा आकडाही पार करता आला नाही. त्यामुळे मविआचे बहुंताश नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी महायुतीचा पर्याय निवडत आहेत. मागच्या काही महिन्यांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये मविआमधून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच इनकमिंग वाढलं आहे. लवकरच काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार आहे.

नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला धक्का बसू शकतो. शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपामधून शरद पवार गटात येऊन गणेश गीते यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गणेश गीतेंसोबत काही माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात गणेश गीते यांनी निवडणूक लढवली होती. येत्या दोन दिवसात गणेश गीते आणि समर्थकांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

बऱ्याच वर्षांपासून एकनिष्ठ कुटुंब काँग्रेसची साथ सोडणार

काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. बऱ्याच वर्षांपासून कुणाल पाटील यांचं कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ होतं. पण आता त्यांनी भाजपची वाट धरली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. धुळे तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी झटका यासाठी आहे, कारण यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच, उपसरपंच आणि बाजार कमिटी सभापती, संचालकांचा समावेश आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी कोलमडून पडणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.