मोठी बातमी! ‘आमचा धंदा हा खोटं बोलण्याचा’, अखेर गुलाबराव पाटील यांनी उद्विग्नता बोलून दाखवली

"आम्ही General Physician आहोत. बायको नांदायला येत नसली, तरी लोकं आमदारकडे येतात", अशा शब्दांत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

मोठी बातमी! 'आमचा धंदा हा खोटं बोलण्याचा', अखेर गुलाबराव पाटील यांनी उद्विग्नता बोलून दाखवली
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 8:22 PM

चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक : “आमचा धंदा हा खोटं बोलण्याचा आहे. खरं बोलणारा माणूस या जगात चालत नाही, असं म्हणतात. आम्ही असे रोल करतो की अभिनेता देखील करू शकत नाही. एखाद्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेलो की मलाच मुलगा झाला अशा आनंदात आम्ही असतो. आमचा रोल करणं अवघड आहे. आमच्याकडे जी OPD आहे, ती कोणत्याही एका फॅकल्टीची नाही. आम्ही General Physician आहोत. बायको नांदायला येत नसली, तरी लोकं आमदारकडे येतात”, अशा शब्दांत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

“पाणी पुरवठा खात्याला महत्त्व नव्हते. पण आता महत्त्व आले. सरपंच जर या पाणी पुरवठा योजनेत यशस्वी झाले तर, ते पडणार नाहीत. राजकारणी, उद्योगपती यांना नाव महत्त्वाचे आहे. आताच्या काळात पदावर राहणे कठीण आहे. एकवेळ आमदार होणं सोपं आहे, पण सरपंच होणं कठीण आहे. मला ब्रेक के बाद देखील तेच खाते मिळाले”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“ही लोकशाही आहे. इथे लोकं सामान्य माणसाला राजा करतात. मी म्हणतो मला पाणीवाला बाबा व्हायचं आहे. पण विरोधक माझ्यावर टीका करतात. पाण्यावर अजिबात राजकारण करू नये, ही विनंती”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“मला देवाने दिलेलं हृदय आहे. ते माझ्याशी बोलते. मंत्री झाल्यावर माझी opd गर्दीने भरली. मध्यंतरी opd गर्दी कमी झाली होती. जो पाणीपुरवठा योजनेत लवकर काम करेल, त्या गावात जलदुत पुरस्कार देऊन टाका. 700 कोटी रुपये वर्षभरात खर्च करणारे डिपार्टमेंट आहे. दोन वर्षात 3500 गावांना वर्क ऑर्डर दिली”, अशी माहिती त्यांनी दिली.

“पाणी जपून वापरण्याची गरज आहे. आपल्याला फक्त अनुदान हवं असतं. पाणी अडविण्याचा विचार करा. नुसतं पाणी दिलं आणि महिलांनी जरी मते दिली, तरी निवडून याल. पुढच्या काळात एवढे पैसे कधीच कोणते सरकार देऊ शकणार नाही. आताच संधीचे सोने करा”, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.