BIG BREAKING | शिवसेनेचा ‘कॅप्टन’ अपात्र ठरणार? अब्दुल सत्तार यांचे नेमके संकेत काय?

| Updated on: May 04, 2023 | 6:42 PM

केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नुकतीच भेट झालीय. राहुल नार्वेकर यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा केलाय. पण तरीही पड्यामागच्या घडामोडींचा आताच्या घडीला अंदाज बांधण कठीण आहे. असं असताना अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

BIG BREAKING | शिवसेनेचा कॅप्टन अपात्र ठरणार? अब्दुल सत्तार यांचे नेमके संकेत काय?
Follow us on

नाशिक : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही जाहीर होऊ शकतो. वकील असीम सरोदे यांनी येत्या 11 किंवा 12 मे ला सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या निकालातून महाराष्ट्रातील पुढील राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत. या निकालानंतर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कदाचित महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघण्याची देखील शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाआधी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना जास्त महत्त्व आहे. कारण निकालानंतर या घडामोडी अंतिम टप्प्यावर जाणार आहेत. असं असताना शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील निकालावर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षाचे कॅप्टन असं संबोधित केलं आहे. “आता आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नसतो. आता त्या 16 आमदारंमध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A , प्लॅन B असतो. पण प्लॅन प्रमाणेच घडते असं काही नाही. आम्ही गेलो तरी इतिहास राहणार. आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार. आमचे पन्ने नाही, इतिहासात लिहिला जाणार. हा निर्णय देशासाठी लागू होईल”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

‘मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी…’

“सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही हसता खेळता मान्य करू. मला काही निकालाची धास्ती नाही. आपली लोकल गाडी. हात दाखवा गाडी थांबवा. मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी सत्तार आमदार पक्का”, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. अब्दुल सत्तार यांना आपण आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकून येऊच अशा विश्वास आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्याही बाजूला लागला तरी आपण पुन्हा आमदार म्हणून जिंकून येऊ, अशी अब्दुल सत्तार यांना खात्री असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

‘पवारांनी भाकरी फिरवण्याऐवजी तवाच पलटी मारला’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अब्दुल सत्तार यांनी पवारांच्या राजीनाम्यावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला. “दुसरी शिवसेना तोंडघशी पडली असेल. शिवसेना आता आमची आहे. शरद पवार एकाच तिरात अनेक पक्षी मारतात. पवारांनी भाकरी फिरवण्याऐवजी तवाच पलटी मारला. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीतील नवीन पिढी घडावी असं त्यांना वाटलं असावं. माझ्या अडीच वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे एकदाच मंत्रालयात गेले असावेत. पवारांनी पुस्तकात दोनदा लिहिलं असेल तर माहित नाही पण माझ्या माहितीप्रमाणे एकदाच”, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.

‘सकाळचा भोंगा वज्रमूठ तोडण्याचं काम करतोय’

“शरद पवार म्हणतात शिवसेनेची झाली ती परिस्थिती झाली नसती. ठाकरे गट म्हणतात, राष्ट्रवादीची जी परिस्थिती झाली ती झाली नसती. वज्रमूठमधली एक मूठ गेली. नंतर दुसरी जाणार, तिसरी जागेवरच राहणार. सकाळचा भोंगा वज्रमूठ तोडण्याचं काम करतोय. आमच्या मतावर खासदार झाले ते विसरले. माझं मत त्यांना दिलं ते आम्हाला शिव्या देतात. वज्रमूठ तुटण्याचं कारण सकाळचा भोंगा आहे. रोज सकाळी सात-आठ वाजता तुमच्यासमोर वाजतो आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रावर होतात”, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.