Sharad Pawar Resigns LIVE Updates : तुमच्या भावनांचा आदर करतो, दोन दिवसानंतर तुम्हाला बसावे लागणार नाही- शरद पवार

| Updated on: May 05, 2023 | 7:01 AM

NCP Chief Sharad Pawar Resigns LIVE News and Updates : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Sharad Pawar Resigns LIVE Updates : तुमच्या भावनांचा आदर करतो, दोन दिवसानंतर तुम्हाला बसावे लागणार नाही- शरद पवार
News and UpdatesImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. तसेच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू झालं आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे पवार राजीनामा मागे घेतील की आपल्या निर्णयावर ठाम राहतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 May 2023 12:05 AM (IST)

    अमोल कोल्हे भाजपात आले तर शिवसेना आणि भाजपाची ताकद वाढेल; आढळराव पाटील यांचं वक्तव्य

    पिंपरीः

    अमोल कोल्हे भाजपात आले तर शिवसेना आणि भाजपाची ताकद वाढेल

    आम्ही त्यांचे स्वागत करतो असं आढळराव यांनी केलं विधान

    अमोल कोल्हेंचा तुम्ही प्रचार करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर कोल्हे कुठल्या लोकसभा मतदारसंघातून उभे राहतात यावर आधारित

    मिश्किल उत्तरामुळे राजकीय चर्चेना उधान

  • 04 May 2023 11:37 PM (IST)

    इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथे दोन ठिकाणी मोठा दरोडा

    – इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथे दोन ठिकाणी दरोडा

    – इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर २ येथे बुधवारी रात्री चार अज्ञात चोरट्यांचा कोयत्याचा धाक दाखवून चोरी केली

    दोन मोबाईल फोन तर दुसरीकडे धाडसी दरोडा टाकला,

    या दोन्ही दरोड्यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

    इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 04 May 2023 11:19 PM (IST)

    जळगावात पांझरापोळ परिसरात अतिक्रमण केलेली घरे जेसीबीच्या मदतीने तोडली

    जळगावात पांझरापोळ परिसरात अतिक्रमण केलेली घरे जेसीबीच्या मदतीने तोडली

    जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील पांझरापोळ परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

    पथकाने अतिक्रमण करून बांधलेले घरे जेसीबीच्या मदतीने गुरूवारी सकाळी  तोडली.

    यावेळी शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढले.

    जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील पांझरापोळ जवळ असलेल्या गट नंबर १६३/१ मधील सार्वजनिक रोडच्या जागेत काहींनी अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या घराचे बांधकाम केल्याचे समोर आले होते.

  • 04 May 2023 11:12 PM (IST)

    गोकुळ दूध संघात सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का; लेखापरीक्षण सुरुच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश

    कोल्हापूर;

    गोकुळ दूध संघात सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का

    गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षा सुरूच ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

    गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी गटाने घेतली होती उच्च न्यायालयात धाव

    मात्र उच्च न्यायालयाकडून सत्ताधारी गटाला दिलासा नाही

    चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यासाठी उच्च न्यायालयाने दिला थेट नकार

    पुढील सुनावणी 8 जूनला होणार पुढील सुनावणी

  • 04 May 2023 11:08 PM (IST)

    आज महाराष्ट्रला आज शरद पवार  यांचीच गरज; अनिल देशमुख

    नागपूर :

    सातत्याने सगळे कार्यकर्ते मुंबईत पोहचत आहे सगळ्यांना वाटतं शरद पवार हेच अध्यक्ष राहावं

    बैठकीत काय होतं ते ठरेल पण शरद पवार यांनीच पदावर राहावं

    आणि आज महाराष्ट्रला आज शरद पवार  यांचीच गरज आहे

    अजित पवार यांनी सांगितलं की, मी जिवंत आहे तो पर्यंत मी राष्ट्रवादीमध्येच

  • 04 May 2023 09:33 PM (IST)

    डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला अटक, पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याचा संशय

    पाकिस्तानला गुप्तचर माहिती दिल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने डीआरडीओच्या एका वैज्ञानिकाला अटक केली आहे. शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटींगच्या एका व्यक्तीने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर शास्त्रज्ञ डीआरडीओशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवत होते.

  • 04 May 2023 08:57 PM (IST)

    शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीत राजीनामा सत्र, विजय गव्हाणे यांचा राजीनामा

    माजी आमदार विजय गव्हाणे यांनी सरचिटणीस पदाचा दिला राजीनामा

    विजय गव्हाणे यांनी जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा

    निर्णय माघारी घेण्यासाठी गव्हाणे यांची पत्राद्वारे शरद पवारांना आवाहन

  • 04 May 2023 08:35 PM (IST)

    हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस, वाकोडीमध्ये नवरा नवरीची तारांबळ

    हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

    वाकोडी येथे मंगलअष्टका सुरु असताना अचानक पावसाची हजेरी

    अचानक पाऊसामुळे नवरा नवरीची तारांबळ

    उपस्थित वऱ्हाड्यांनी अंगावर चटाई घेऊन लावलं लग्न

  • 04 May 2023 08:21 PM (IST)

    शिवाजी अढळराव पाटील यांच्या 'त्या' विधानावर अमोल कोल्हेंनी बोलणं टाळलं

    सध्या अमोल कोल्हे यांची भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे

    अढळराव पाटील यांच्याकडून अमोल कोल्हे यांचं भाजपमध्ये स्वागत

    अढळरावांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हे 17 मे रोजी बोलणार

  • 04 May 2023 06:53 PM (IST)

    परभणी : विजय गव्हाणे यांचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय गव्हाणे

    शरद पवार यांना पत्राद्वारे निर्णय माघारीचे आवाहन

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केला राजीनामा सुपूर्त

  • 04 May 2023 05:54 PM (IST)

    बुलढाणा : शरद पवार यांनी आवाहन केल्यावरही राजीनामा सत्र सुरूच

    बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 80 पदाधिकाऱ्यांना दिले पदाचे राजीनामे

    १३ तालुक्यातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे दिलेत राजीनामे

    सर्व राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविण्यात आल्याची जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची माहिती

    शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी पदाधिकारी देत आहेत राजीनामे

  • 04 May 2023 05:36 PM (IST)

    धाराशिव : बळवंत थिटे यांचे झाडावर चढून आंदोलन

    लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याचे सत्याग्रह आंदोलन

    शरद पवार यांनी राजीनामा देताना कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते

    थिटे यांनी 1993 ते 2014 या काळात वाढवली होती आपली दाढी

    शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत अशी होती या कार्यकर्त्याची इच्छा

  • 04 May 2023 03:49 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी संपर्कात नाही- बावनकुळे

    कुणीही आमच्या संपर्कात नाही- चंद्रशेखर बावनकुळे

    राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी संपर्कात नाही- बावनकुळे

    ठाकरे बेईमानी करून मुख्यमंत्री झाले- चंद्रशेखर बावनकुळे

    हुकुमशाहीच्या वागणुकीमुळे 40 आमदार निघून गेले- बावनकुळे

  • 04 May 2023 03:45 PM (IST)

    2024 पर्यंत साहेबांनी नेतृत्व करावं- रुपाली पाटील

    सुप्रिया सुळे अध्यक्ष आधीचं सक्षम नेतृत्व आहे

    जर त्यांना संधी मिळाली तर आम्ही स्वागतचं करू

    मात्र शरद पवारांनी असा निर्णय घेणं हे पचनी पडत नाही

    राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस

    अजित पवार समजून सांगण्याचा प्रयत्न करतायेत

    जर साहेबांच्या समोर राष्ट्रवादी आणखी बळकट झाली तर तुम्हाला चालणार नाही का.?

    मात्र 2024 पर्यंत साहेबांनी नेतृत्व करावं

    भाजप अजित पवारांच्या खोट्या बातम्या पसरवतं

    त्याला छेद देण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे

    भाजपला याचा काही फायदा होणार नाही

    आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे त्यामध्ये भाजपनं फायदा बघू नये

    रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

  • 04 May 2023 03:10 PM (IST)

    1-2 दिवसात अंतिम निर्णय घेणार- शरद पवार

    'तुमच्या भावनांचा आदर करुन 1-2 दिवसात निर्णय घेतो'

    1-2 दिवसात अंतिम निर्णय घेणार- शरद पवार

    2 दिवसानंतर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही- पवार

    तुमच्या भावनांचा आदर करतो- शरद पवार

    चर्चा केली असती तर तुम्ही विरोध केला असता- पवार

  • 04 May 2023 01:59 PM (IST)

    निवृत्ती मागे घ्या असं मी पवारांना कसं काय सांगू - उद्धव ठाकरे

    मुंबई : शरद पवार यांना मी दिलेला सल्ला पचणी पडला नाही तर काय करू?

    उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या शंकेवर दिली प्रतिक्रिया

    राष्ट्रवादीत काहीही घडलं तर महाविकास आघडीला तडा जाणार नाही

    शरद पवार यांचा निर्णय अंतिम नाही

    प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार

  • 04 May 2023 01:40 PM (IST)

    शरद पवार यांच्याकडे संपूर्ण देश पाहतोय - जितेंद्र आव्हाड

    मुंबई : शरद पवार यांची संपूर्ण देशाला गरज आहे

    देशातल्या अनेक नेत्यांनी सांगितलं की शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये

    खासदारकिचा कालावधी असे पर्यन्त तुम्ही राजीनामा देऊ नका

    विरोधी पक्षातील विरोधी नेत्यांना एकत्र फक्त शरद पवार आणू शकतात

  • 04 May 2023 01:17 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांच्या समोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    मुंबई : कहो दिलसे साहेब फिरसे अशा घोषणा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्या

    शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले

    सुप्रिया सुळे यांनी त्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र न लिहिता उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली

  • 04 May 2023 01:04 PM (IST)

    शरद पवार फार विचारार्थी निर्णय घेतात - मधुकर पिचड

    नाशिक : मी सध्या भारतीय जनता पक्षात आहे

    त्यांनी काय निर्णय घेतला, मी सांगू शकणार नाही

    पवार साहेबांचा देशपातळीवर कर्तृत्वाचा मोठा इतिहास आणि वारसा आहे

    त्यांच्या निर्णयाचे परिणाम देश आणि राज्य पातळीवर होत असतात

    त्यांच्या निर्णयाचे सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे

    त्यांच्याशी माझा संपर्क नाही

    नवीन नेतृत्व कोण होणार, हा पक्षांतर्गत विषय आहे

    पक्षांतर्गत योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मधुकर पिचड यांनी दिली आहे

  • 04 May 2023 12:56 PM (IST)

    उद्या मिटिंग आहे, चर्चेला बसू, तरीही सुप्रिया सुळे यांच्यासमोरच कार्यकर्ते आक्रमक

    - साहेब आणि आम्ही सगळेच तुमचे ऐकून घेत आहेत.

    - पवार साहेब यांना दोन ते तीन दिवसांची मुदत द्यावी.

    - साहेबांना परत भेटणार का ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

    - साहेबांचा निरोप घेऊन आले आहे. हे रक्त वगैरे काही करू नका.

    - १ वाजेपर्यंत बसा, एक वाजता स्थगिती देऊ

    - आज तिसरा दिवस आहे, आम्ही हटणार नाही.

    - निर्णय झाला नाही तर उद्या पुन्हा अकरा वाजता चर्चेला बसू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या तरीही कार्यकर्ते आक्रमक होते.

  • 04 May 2023 12:41 PM (IST)

    शरद पवार निणर्य मागे घेणार का ? काय म्हणाले जयंत पाटील

    - महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना साकडे घातले.

    - अनेकांनी त्यांना फोन करून वेगळ्या मार्गाने संपर्क करून त्यांना हा निर्णय त्यांनी घेऊ नये असा आग्रह केला.

    - देशातल्या वेगवेगळ्या राज्यातले अध्यक्ष आणि नेते त्यांना हेच सांगत आहेत.

    - पण, शरद पवार साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम दिसत आहेत.

    - महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांचा, तरुणांचा ज्यांनी पवार साहेबांच्या पिढीत काम केलं त्या सर्वांचा आग्रह आहे की पवार साहेबांनी आणखीन येणाऱ्या लोकसभेपर्यंत विधानसभेपर्यंत या पदावर कायम रहावे.

  • 04 May 2023 12:18 PM (IST)

    वायबी सेंटरमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी

    सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल वायबी सेंटरमध्ये दाखल

    संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पवार यांच्या गाठीभेटी होणार

  • 03 May 2023 11:57 PM (IST)

    मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला; पुढील पाच दिवस इंटरनेट सेवा बंद

    मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला

    बिष्णुपूर आणि चुरचंदपूरमध्ये हिंसाचार घडल्याने जनजीवन विस्कळीत

    पुढील पाच दिवस राज्यात इंटरनेट सेवा बंद

    दोन्ही जिल्ह्यात कलम 144 लागू

    शांतता राखण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

  • 03 May 2023 11:44 PM (IST)

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा तरुणांचा गोंधळ

    अहमदनगर/श्रीगोंदा

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा तरुणांचा गोंधळ

    पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप, चाहत्यांना आवरण्यासाठी पोलिसांची कसरत

    तर अनेक हुल्लडबाजांना पोलिसांचे फटके

    गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजांना धिंगाणा

  • 03 May 2023 11:29 PM (IST)

    रत्नागिरीत राज ठाकरे यांची तोफ धडाडणार; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

    रत्नागिरी :
    रत्नागिरीत राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू
    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार
    राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
    मुंबईतील कार्यकर्ते रत्नागिरीत पोहोचले असून मनसे अध्यक्षांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावत आहेत.
  • 03 May 2023 11:24 PM (IST)

    बेळगावांत भडकावू भाषण देऊन दंगे घडवण्याचं काम सर्वज्ञानी करताहेत; चित्रा वाघ यांची टीका

    मुंबईः

    गैरव्यवहारात जेलची हवा खाऊन आलेल्या आरोपीला प्रचारात उतरवण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आलीय….

    अहो सर्वज्ञानी, लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर निशाणा साधला

    तुम्ही तर उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं

    बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. शिवसेना फोडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम राऊतांनी केलं

    आता ते सुपारी घेऊन आले आहेत

    बेळगावांत भडकावू भाषण देऊन दंगे घडवण्याचं काम सर्वज्ञानी करताहेत…

  • 03 May 2023 11:12 PM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दोन स्टार प्रचारकांना निवडणूक आयोगाचा दणका

    नवी दिल्ली :

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दोन स्टार प्रचारकांना निवडणूक आयोगाचा दणका

    काँग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांना कारणे दाखवा नोटीस

    मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे आणि भाजप उमेदवार बसन गौड पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस

    भाषणामध्ये केल होत वादग्रस्त वक्तव्य

    पाटील यांचे वक्तव्य-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी नाग आहेत तर सोनिया गांधी या विषकन्या

    प्रियांक खर्गे यांचे वक्तव्य -पंतप्रधान यांच्यासारखा नालायक व्यक्ती असेल तर घर कसं चालेल

    गुरुवारी उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोघांनाही निवडणूक आयोगासमोर उत्तर द्यावं लागणार

  • 03 May 2023 10:43 PM (IST)

    पीएम मोदी डॉक्युमेंटरी प्रकरणी कोर्टाने बीबीसीला बजावला समन्स

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त माहितीपटात दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने बीबीसीला समन्स बजावले आहे. रोहिणी न्यायालयाने बीबीसी, विकिपीडिया आणि इंटरनेट आर्काइव्हला समन्स बजावले आहेत. मानहानीच्या प्रकरणी हे समन्स बजावले आहे. या प्रकरणी 11 मे रोजी सुनावणी होणार आहे.

  • 03 May 2023 10:37 PM (IST)

    भारतीय वंशाचे अजय बंगा जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष

    भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढचे अध्यक्ष असणार आहेत. 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने अजय बंगा यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. बंगा हे पुढील पाच वर्षांसाठी जागतिक बँकेचे अध्यक्ष असतील. अजय बंगा 2 जूनपासून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

  • 03 May 2023 10:31 PM (IST)

    सोनिया गांधी 6 मे रोजी कर्नाटकातील हुबळी येथे सभेला करणार संबोधित

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वच पक्षांनी विजयासाठी पूर्ण ताकद लावली आहे. कर्नाटकातील हुबळी येथे 6 मे रोजी सोनिया गांधी सभेला संबोधित करणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

  • 03 May 2023 10:17 PM (IST)

    दिल्लीत 24 तासांत कोरोनाचे 272 नवे रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

    दिल्लीत कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये झपाट्याने घट होत आहे. एका दिवसात कोरोनाचे 272 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण समोर आल्यानंतर दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर 8.39% झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाचे एकूण 1971 सक्रिय रुग्ण आहेत.

  • 03 May 2023 09:35 PM (IST)

    मच्छीमारीचा छंद जिवाशी

    भिवंडी तालुक्यातील कांदळी गावात जिलेटिन कांडीच्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू खिशात जिलेटिन कांडीचा अचानक स्फोट झाल्याने व्यक्तीचा मृत्यू घटनास्थळीपोलिसांसह फॉरेन्सिक व एटीएसचे पथक दाखल.

  • 03 May 2023 08:46 PM (IST)

    ब्लू डार्ट कूरियर कंपनीच्या नावाखाली फसवणूक, तीन जणांना अटक

    मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी जामतारा येथून तीन घोटाळेबाजांना केली अटक

    11 मोबाईल आणि 1 लाख 70 हजारांची रोकड केली जप्त

    अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी जामतारा झारखंडचे रहिवासी आहेत

    कांदिवली पोलिसांकडून तिन्ही आरोपींची चौकशी सुरु

  • 03 May 2023 08:44 PM (IST)

    लखनऊ : हजरतगंजच्या दालीबागमध्ये इमारत कोसळली

    लखनऊच्या हजरतगंज येथील दालीबागमध्ये इमारत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत व्हीआयपी गेस्ट हाऊसजवळ पडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

  • 03 May 2023 08:33 PM (IST)

    संजय राऊतांची भाजप आणि फडणवीसांवर टीका

    शिवसेना नसती तर अयोध्येत राम मंदीर उभं राहिल नसतं

    बाबरी पाडणारे शिवसैनिक तर शेपूट टाकून पळणारे भाजपावाले

    उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या मराठीविरोधात सभा घेणार

    बेळगावातून संजय राऊत यांची भाजपवर टीका

  • 03 May 2023 08:22 PM (IST)

    महाविकास आघाडीच्या संभाव्य सभांबाबत संभ्रम

    नाना पटोले बोलतात सभा रद्द तर राऊत म्हणतात सभा होणार

    14 मे रोजी पुण्यात तर 28 मे रोजी कोल्हापूरला संभाव्य सभा

    3 जूनला नाशिकमध्ये तर 11 जूनला अमरावतीत संभाव्य सभा

    सभा होणार का? याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष

  • 03 May 2023 08:13 PM (IST)

    वाशिममधील अनेक शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

    मालेगाव शहरासह अनेक ग्रामीण भागात जोरदार पाऊस

    मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

    अवकाळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत

  • 03 May 2023 07:59 PM (IST)

    संजय राऊतांची खानापूरच्या सभेतून विरोधकांवर टीका

    शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही

    महाराष्ट्रातील घडामोडींचा इथे परिणाम होणार नाही

    बाळासाहेब आणि शरद पवार नेहमी इथल्या मराठी माणसाच्या बाजूने

    जाणून-बुजून मराठी माणसाचा आवाज दाबला जातोय

  • 03 May 2023 07:49 PM (IST)

    पुणे विद्यापीठातील रॅप गाण्याच्या शूटिंग प्रकरणी अद्याप कारवाई नाही

    चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे सादर

    दरम्यान प्राथमिक अहवालात कारवाईबाबत अजूनही स्पष्टता नाही

    पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप जबाबदार व्यक्तीवर कारवाई नाही

    चौकशी समितीचा मुख्य अहवाल आल्यानंतरच होणार कारवाई

  • 03 May 2023 06:59 PM (IST)

    भिवंडी येथे दोन मुलांचा मृत्यू

    दगड खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा मृत्यू

    मंगळवारी पोहायला गेले ते परतलेच नाही

    आज दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले

    भोईवाडा पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद

  • 03 May 2023 06:56 PM (IST)

    भंडारा : नाना पटोले शेतातील बांधावर

    काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले शेतातील बांधावर

    पालांदूर येथील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

    काल गारपिटीसह वादळी वाऱ्याची जोरदार हजेरी

    तहसीलदार यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश

  • 03 May 2023 06:38 PM (IST)

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप साँग शूटिंग प्रकरण

    चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठ कुलगुरूंना सादर

    प्राथमिक अहवालात कारवाईबाबत स्पष्टता नाही

    विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप जबाबदार व्यक्तीवर कारवाई नाही

    चौकशी समितीचा मुख्य अहवाल आल्यानंतरच होणार कारवाई

  • 03 May 2023 06:16 PM (IST)

    पुणे : निवृत्ती मागे घेण्यासाठी शरद पवार यांना आवाहन

    माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवार यांना केले आवाहन

    1970 पासून लांडे कुटुंबीयांचे शरद पवार यांच्यावर प्रेम

    प्रेमापोटी देव घरात शरद पवार यांचा लावला फोटो

    शरद पवार यांची रोज पूजा करणारे माजी आमदार विलास लांडे

  • 03 May 2023 06:10 PM (IST)

    पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न

    रशियाची राजधानी मॉस्कोच्या क्रेमलीनमध्ये ड्रोन हल्ला

    ड्रोन हल्ल्यात पुतीन थोडक्यात बचावले - रशिया

    राष्ट्रपती पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा

  • 03 May 2023 05:38 PM (IST)

    दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पुण्यातून अनोखा पाठिंबा

    पुण्यात प्रतीकात्मक कुस्ती खेळत दिल्लीतल्या आंदोलनाला दिला जाणार पाठिंबा

    ब्रिजभूषणवरील कारवाईसाठी पुण्यात होणार आंदोलन

    एस.पी. कॉलेजच्या मैदानात होणार प्रतिकात्मक कुस्त्या

    दिल्लीतील जंतरमंतर मैदानात महिला कुस्तीपटूंनी पुकारलेल्या आंदोलनाला साथ देण्यासाठी पुण्यात कुस्त्यांचं अयोजन

    प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आलं प्रतीकात्मक कुस्तीचं आयोजन

    4 मे रोजी सकाळी होणारं प्रतीकात्मक कुस्त्या

  • 03 May 2023 05:33 PM (IST)

    6 तारखेला काहीतरी घडवण्याचं षडयंत्र - निलेश राणे

    येत्या 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसूत येणार आहेत

    त्या दिवशी मोठं काहीतरी घडवण्याचे षडयंत्र होत आहे

    निलेश राणेंचा मोठा दावा

    बारसुमध्ये काही दिवसांपासून जे घडतेय ते सांगण्यासाठी मी ही पत्रकार परिषद बोलावलीय

    जनतेला आणि अधिकाऱ्यांना या गोष्टी कळाव्यात हा उद्देश

    बोअरवेल मारण्याचे काम तिथे सुरू आहे

    6 तारखेला उद्धव ठाकरे तिथे येणार असल्याचे कळले

    त्यासाठी मागच्या दरवाजाने अनेक तयारी सुरू आहेत अस मला कळलं

    जिलेटीन स्टिक गोळ्या करण्याचे काम काही लोक करत आहेत, ते कशासाठी मला माहित नाही

    ज्यांना 6 तारखेला काही घडवायचं आहे ते लोक असा प्रयत्न करत आहेत

    ही बाहेरची लोकं आहेत

    याची माहिती मी उद्या पोलिसांना आणि फडणवीस यांना देणार

    बाहेरच्या लोकांना 6 तारखेला वातावरण चिघळवायचं आहे

    हे बाहेरचे लोक आहेत, यात उद्धव ठाकरेंचा काही संबंध नाही

    हा विषय फार सिरीयस घ्या म्हणून मी पालकमंत्री यांना सांगणार आहे

    जर हा विषय निलेश राणेंना कळतो याचा अर्थ काही तरी घडतंय म्हणूनच ना

    जिलेटीन स्टीकचा हा एक विषय माझ्या कानावर आला, अजून काही विषय असू शकतात

    अस मटेरियल एका आंदोलनासाठी इथे यायला लागलं तर फार गंभीर विषय आहे

    राजन साळवीला कुत्र विचारत नाही, आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही

    त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बारसुत जाऊन दाखवावं, आम्ही बारसुत जाऊन आलो

    जैतापूर प्रकल्प आणण्यासाठी आम्ही सर्व पणाला लावलं होतं

    उद्धव ठाकरे बारसुला चिघळवायला येत असतील

    तर समर्थन किती मोठ्या प्रमाणात आहे हे दाखवण्यासाठी समर्थन मोर्चा काढावा लागेल

    विरोध करायचा आणि ठेके मिळवायचे अशी उद्धवजींची पद्धत

    पवार साहेब देशाचे नेते आहेत त्यांच्या पक्षासाठी

    त्यांनी का अस केलं हे त्यांनाच माहीत

    अजित पवार सोडून अध्यक्ष शरद पवारच रहावेत असे सर्वांना वाटते

    उद्धव ठाकरेंसारखी बाहेरची लोक बारसुच वातावरण बिघडवत आहेत

    हा प्रकल्प गेला तर यानंतर कोकणात 5 कोटींचा ही प्रकल्प येणार नाही, हा चौथा प्रकल्प जाईल

  • 03 May 2023 05:18 PM (IST)

    पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात

    स्वारगेट, सिंहगड रोड आणि कर्वेनगर परिसरात पाऊस

    वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

  • 03 May 2023 05:18 PM (IST)

    नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाची हजेरी

    देगलूरसह बिलोली मुखेड आणि नायगाव तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

    सातत्याने बरसणाऱ्या या पावसामुळे नांदेडमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण

    पावसामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल

  • 03 May 2023 05:16 PM (IST)

    भाईंदर पश्चिम येथे अपंग फेरीवाल्याला भररस्त्यात मारहाण

    मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    फेरीवाल्याच्या तक्रारीवरुन भाईंदर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल

    आरोपीला भाईंदर पोलिसांनी केली अटक

  • 03 May 2023 05:12 PM (IST)

    शरद पवारांच्या कालच्या निर्णयामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय - सचिन अहिर

    महाविकास आघाडीची सभा पुढे ढकलली जाईल, रद्द होणार नाही

    शरद पवारांना मी कधी थांबताना बघितले नाही

    ते अशा प्रवाहातून बाहेर जाऊ शकत नाही

    त्यांनी असा निर्णय घेणं म्हणजे एक प्रश्नचिन्ह आहे

    कुटुंबामध्ये निवृत्तीबाबत चर्चा झाली असेल

    ते राजकारणातून नाही तर पदावरून निवृत्त होत आहेत

    पवारांच्या जीवनावर एक राजकीय ग्रंथ तयार करु शकतात इतका ज्ञानाचा भंडार आहे

    त्यांच्या जीवनात फक्त वादग्रस्त गोष्टी नाहीत

  • 03 May 2023 05:08 PM (IST)

    पवारांचा राजीनामा देण्याची घोषणा कुठल्याही नेत्याला विचारात न घेता घेतल्यानं नाराजी

    शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी

    पवार यांच्या कुटुंबांच्या बैठकीत राजीनाम्याचा निर्णय

    राष्ट्रवादीच्या नेत्यांना गृहित धरल्यानं राष्ट्रवादीचे काही नेते नाराज

  • 03 May 2023 05:08 PM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती

    बॅनरमार्फत केली विनंती

    "साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे"

    "केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब,

    कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा" अशा मजकुराचे लावले बॅनर

  • 03 May 2023 05:06 PM (IST)

    जळगावमध्ये खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला अपघात

    जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ घडला अपघात

    अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी

    चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्याला धडकली

  • 03 May 2023 05:00 PM (IST)

    पवारांच्या कालच्या निर्णयामुळे लोकांमध्ये संभ्रम-सचिन अहिर

    पवार प्रवाहातून बाहेर जाऊ शकत नाही

    पवार राजकारणातून नाही तर पदावरून निवृत्त

    मविआची सभा रद्द होणार नाही- सचिन अहिर

  • 03 May 2023 04:58 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बैठक

    5 मे रोजी राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरणार

    5 मे रोजी अध्यक्षपद निवड समितीची बैठक

  • 03 May 2023 04:50 PM (IST)

    समिती जो निर्णय घेईल तो मान्य- शरद पवार

    कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं-पवार

    'विचारुन निर्णय घेतला असता तर विरोध झाला असता'

    'विरोध केला असता म्हणून थेट निर्णय जाहीर केला'

    कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतो-पवार

    'ग्रामीण भागातील युवक, युवतींना मुख्य प्रवाहात आणणार'

  • 03 May 2023 04:45 PM (IST)

    राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे ला ठरणार

    अध्यक्षपदाबाबत 5 मे ला बैठक

    NCP च्या अध्यक्ष पदाबाबत 5 मे ला निवड समितीची बैठक

    राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे ला ठरणार

    नवीन अध्यक्ष निवडण्याबाबत बैठक होणार

    6 मे ची बैठक 5 मे ला घ्या - शरद पवार

    समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य- शरद पवार

  • 03 May 2023 04:39 PM (IST)

    सक्षणा सलगर युवती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

    शरद पवारांची निवृत्ती आम्हाला अमान्य-सलगर

    कार्यकर्त्यांना पवारच अध्यक्ष हवे-सलगर

  • 03 May 2023 04:25 PM (IST)

    संजय राऊत यांना जामीन मंजूर

    2018 मधील प्रक्षोभक विधान केल्याचं प्रकरण

    संजय राऊत यांना जामीन मंजूर

    राऊतांकडून न्यायालयात हजर राहत वॉरंट रद्द

  • 03 May 2023 04:20 PM (IST)

    बस पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील लेनवर वाहतूक खोळंबली

    रायगड, पेण तालुक्यातील वडखळ डोलवी हद्दीतील जे एस डब्ल्यू कंपनीची कामगारांना घेऊन जाणारी बस पलटी

    उचेडे नजीक ब्रिजवर टायर फुटून बस पलटी होऊन अपघात

    17 ते 18 कामगार करत होते बस मधून प्रवास

    7 ते 8 प्रवाशी जखमी.

    बस पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील लेनवर काही काळ वाहतूक खोळंबली

  • 03 May 2023 04:18 PM (IST)

    मला अध्यक्षपदात रस नाही- प्रफुल्ल पटेल

    शरद पवार 'सिल्व्हर ओक' वर दाखल

    शरद पवारांसोबाबत सुप्रिया सुळेही दाखल

    मला अध्यक्षपदात रस नाही

    प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

    कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब नाही

    पवारांना विचार करण्यास वेळ द्यायला हवा

    कुठलीही राष्ट्रवादीची बैठक नव्हती

    प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

  • 03 May 2023 04:14 PM (IST)

    पुण्यातील पंच तारांकित हॉटेल मध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय

    पुणे स्टेशन परिसरातील हॉटेल मधून ३ दलालांना अटक

    दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणी ताब्यात

    रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.

    हे दलाल सोशल मीडियावरून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील फाईव्ह स्टार हॉटेलमधील खोली बुक करून परराज्यातील तरुणींना तेथे बोलावून घेत. त्यानंतर ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून आर्थिक व्यवहार करत होते.

    पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशीअंती येरवडा भागात आणखी दोन तरुणी व तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली

    या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल

  • 03 May 2023 04:07 PM (IST)

    पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही

    कुठलीही राष्ट्रवादीची बैठक झाली नाही

    पवार नेहमीप्रमाणे वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये आले होते

    पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही

    अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही

    कुणाच्या नावावर अद्याव शिक्कामोर्तब झालं नाही

    छगन भुजबळांनी वैयक्तिक मत व्यक्त केलं असेल

    प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

  • 03 May 2023 03:59 PM (IST)

    शरद पवार 'सिल्व्हर ओक'कडे रवाना

    शरद पवार 'सिल्व्हर ओक'कडे रवाना

    शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेही रवाना

  • 03 May 2023 03:03 PM (IST)

    शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा आणि त्यांनीच अध्यक्ष रहावे हीच आमची इच्छा - प्रशांत जगताप

    पवार साहेबांनी इतर कुणाकडे जबाबदारी दिली तर तो ही आदेश आम्हाला मान्य असेल - प्रशांत जगताप

    सुप्रिया सुळे की अजित पवार अध्यक्ष होणार याबाबत आम्हाला काही माहिती नाही - प्रशांत जगताप

    शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं हीच आमची इच्छा आहे, पक्षासाठी ते महत्वाचं आहेत - प्रशांत जगताप

  • 03 May 2023 02:13 PM (IST)

    शरद पवार यांचा निर्णय योग्य नाही, त्यांनी निर्णय बदलावा - जयंत पाटील

    शरद पावारांशी फोनवर बोलणं झालं - जयंत पाटील

    सुधीर मुनगंटीवारांच्या मनात राष्ट्रवादीबद्दल प्रचंड तिरस्कार - जयंत पाटील

  • 03 May 2023 01:54 PM (IST)

    शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा - आमदार हिरामण खोसकर

    नाशिक : शरद पवार यानं राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा

    राजीनाम्याच्या एक दिवस आधी भेटलो पण चेहऱ्यावर काही दिसले नाही

    मार्केट कमिटीच्या निकालाची माहिती घेतली, एक तास वेळ दिला

    हात जोडून विनंती करतो म्हणत आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितल्या आठवणी

    शरद पवार यांच्यामुळेच मी आमदार झालो - खोसकर

  • 03 May 2023 01:42 PM (IST)

    राजीनाम्याबाबत जयंत पाटलांच मोठं विधान

    पुणे : मला बैठकीची कोणतीही कल्पना नव्हती

    मला बैठकीला बोलवावं असं त्यांना वाटलं नसावे

    मी राजीनामा दिलेला नाही, मी नाराजही नाही

  • 03 May 2023 01:27 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या नेत्यांची चार वाजता सिल्व्हर ओक वर बैठक

    मुंबई : प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची उपस्थिती

    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक

    शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बैठक

  • 03 May 2023 01:25 PM (IST)

    जयंत पाटील 5 वाजता मुंबईत जाणार

    पुणे : जयंत पाटील सध्या पुण्यात

    जयंत पाटील यांची साखर आयुक्तांसोबत बैठक

    मी राष्ट्रीय नेता नाही त्यामुळे मला बैठकीबद्दल माहिती नाही

    जयंत पाटील यांची पुण्यात माहिती

  • 03 May 2023 01:13 PM (IST)

    बैठकीत मला निमंत्रण नव्हतं - जयंत पाटील

    पुणे : माझी कुणाशी कुठलीही चर्चा झालेली नाही

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती

    मुंबईतील बैठकीची मला कल्पना नव्हती

    शरद पवार हेच अध्यक्ष राहावे - जयंत पाटील

  • 03 May 2023 01:08 PM (IST)

    राज्यसभेच्या टर्मपर्यन्त शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावं, बैठकीत एकमत

    मुंबई : वाय बी सेंटर येथे झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे मत

    सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्ष बाबत चर्चा नाही

    शरद पवार यांनी राजीनामा मागे यावर पदाधिकारी ठाम

  • 03 May 2023 01:08 PM (IST)

    सोलापुरात पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक

    सोलापूरकरांवरील पाण्याचे विघ्न दूर व्हावे यासाठी ठाकरे गटातर्फे महानगरपालिकेसमोर सत्यनारायणाची महापूजा

    पाणी प्रश्नासाठी ठाकरे गटाचे अनोख्या पद्धतीने आंदोलन

    सोलापूर महानगरपालिकेत पाण्याच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

    सोलापूर महानगरपालिकेत पाणी प्रश्नावर सत्यनारायणाची महापूजा घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे.

  • 03 May 2023 01:00 PM (IST)

    जयंत पाटील यांना बैठकीचे निमंत्रण नाही, शरद पवार यांनी केला फोन

    - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक होती.

    - मात्र, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निमंत्रण नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली.

    - शरद पवार यांनी स्वतः जयंत पाटील यांना फोन करून बैठकीला बोलावले.

    - पुण्याला एका बैठकीसाठी निघालेले जयंत पाटील परत निघाले असून काही वेळात ते पोहोचत आहेत.

  • 03 May 2023 12:46 PM (IST)

    शरद पवार यांच्या राजीनाम्याची बातमी शॉकिंग, पण वज्र मूठ ही वज्र मूठच राहील - यशोमती ठाकूर

    - पुरोगामी विचाराचे पाईक म्हणून शरद पवार यांना पहिले जाते.

    - आपली जी संस्कृती आहे त्यामध्ये आपण जेष्ठ लोकांना कधीच बाजूला सारत नाही. मात्र, भाजपमध्ये वाळीत टाकून देतात.

    - शरद पवार यांनी बाजूला न जाता कार्यकारी अध्यक्ष नेमावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावे.

    - काही मंडळी जेष्ठ आणि काही मंडळी तरुण असे कॉम्बिनेशन राहिले पाहिजे.

    - सुप्रिया सुळे या समजदार आहे पवार साहेबांच्या तालमीत त्या तयार झालेल्या आहेत. आमच्याही मार्गदर्शक आहेत.

    - सुप्रिया ताई मोठ्या झालेल्या बघायला नक्कीच आवडेल महाराष्ट्रालाही ते आवडेल.

    - पवारांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम झाला नाही पाहिजे अशी इच्छा आहे.

    - महाविकास आघाडीची वज्र मूठ आहे ही वज्र मूठच राहिली पाहिजे

  • 03 May 2023 12:34 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा आंदोलन सुरु, आतापर्यंत कुणी कुणी दिले राजीनामे ?

    - पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बॅनरबाजी करून शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.

    - राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अनिल पाटील यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

    - पनवेल शहर अध्यक्ष सतीश पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

    - बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाजीर काझ यांचा राजीनामा

    - धाराशिवचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यासह अन्य ३२ पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे.

    - शरद पवार जोपर्यंत आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत राजीनामा मागे घेणार नसल्याची भूमिका राजीनामा देणाऱ्यांनी घेतली आहे.

  • 03 May 2023 12:26 PM (IST)

    राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी समिती जाहीर होण्याची शक्यता, कोण असणार या समितीत ?

    - राष्ट्रवादी काँग्रेसची नवी कार्यकारिणी समिती जाहीर होण्याची शक्यता आहे.

    - सुप्रिया सुळे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा या समितीत समावेश असेल.

    - यासोबतच छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांचाही समावेश असणार आहे

    - त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, के. के. शर्मा, पो. सी. चाको हे ही या समितीत असणार आहेत.

  • 03 May 2023 12:15 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांनी दिला सरचिटणीस पदाचा राजीनामा

    - शरद पवार यांनी आपला निर्णय घ्यावा यासाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.

    - राष्ट्रवादीचे आमदार आणि सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    - मी मानसशास्त्रज्ञ नाही, पण पवार साहेब यांचे आजारपणाचे कारण चुकीचे आहे.

    - शेवटी शरद पवार साहेब जे म्हणतील ते अंतिम असेल.

    - पण, आम्हाला विश्वासात न घेता तडकाफडकी राजीनामा देण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

  • 03 May 2023 12:08 PM (IST)

    संजय राऊत चोंबडेपणा करू नका, नाना पटोले भडकले

    - शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

    - या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नव्या नेतृत्वाला संधी मिळायला हवी असे सांगतानाच काँग्रेसचे उदाहरण दिले.

    - काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत. मात्र, निर्णय गांधीच घेतात असे वक्तव्य केले.

    - राऊत यांच्या या वक्तव्यावर काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला.

    - संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये. आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये.

    - ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • 03 May 2023 11:44 AM (IST)

    वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरू

    अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल यांच्यासह अनेक महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित

    राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाची आज होऊ शकते घोषणा

    बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष

  • 03 May 2023 11:37 AM (IST)

    सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा ? शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यासाठी बनविण्यात आलेल्या कमिटीची साडे अकरा वाजता बैठक होत आहे.

    यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत आहे.

    या समितीमधील अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

  • 03 May 2023 11:24 AM (IST)

    USA Defaulter : आर्थिक महासत्तेचे गणित फिसकटले

    महागाईपुढे अमेरिकेने टेकवले गुडघे

    कर्ज फेडण्यासाठी पण आता पैसा नाही

    जूनपर्यंत तजवीज न झाल्यास डिफॉल्टची होऊ शकते घोषणा

    अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यादांच कर्ज बुडविण्याची घटना

    भारतासह जगावर काय होईल परिणाम, वाचा सविस्तर 

  • 03 May 2023 11:14 AM (IST)

    थोड्याच वेळात होणार राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक

    शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह महत्वपूर्ण नेते या बैठकीसाठी उपस्थित

    वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये होणार बैठक

    राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत होऊ शकतो निर्णय

  • 03 May 2023 11:02 AM (IST)

    सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष ?

    सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होण्याचे मिळत आहेत संकेत

    शरद पवार - अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती

  • 03 May 2023 10:52 AM (IST)

    शरद पवार यांचं नेतृत्व अढळ आहे - संजय राऊत

    राजकारणातील पवारांचं स्थान कायम आहे, ते राहील.

    जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ

  • 03 May 2023 10:47 AM (IST)

    शरद पवारांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही - संजय राऊत

    शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे, त्यांनी राजकारण सोडलेले नाही

    शरद पवार देशाच्या राजकारणात कार्यरत राहतील

    भाजप नेस्तनाबूत होईपर्यंत पवार काम करत राहतील

  • 03 May 2023 10:44 AM (IST)

    संजय राऊत यांचे शिंदे - फडणवीसांना आव्हान

    शिंदे -फडणवीसांनी एकीकरण समितीचा प्रसार करावा

    महाराष्टातील भाजप नेत्यांची सीमावासियांशी बेईमानी

    शिंदेची शिवसेना खरी असेल तर सीमावासियांशी गद्दारी करणार नाहीत

  • 03 May 2023 10:40 AM (IST)

    आम्ही शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू - छगन भुजबळ

    - शरद पवारांसारखा नेता होणं शक्य नाही, अगदीच काही झालं नाही तर या कमिटीला निर्णय घ्यावा लागेल

    -  शरद पवार यांना पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करू

    - राज्यात अजित पवारांनी कार्यभार पहावा आणि देशात सुप्रिया सुळे यांनी कारभार पाहावे, त्या संसद रत्न आहेत, ऊत्तम काम करू शकतात

  • 03 May 2023 10:38 AM (IST)

    ठाकरे कुटुंबियांना बदनाम करणं हाच राऊतांचा डाव आहे - नितेश राणे

    मोहित कंबोज यांना संजय राऊत विनाकारण डिवचत आहेत

    डिवचल्यानंतर कंबोज यांनी तेजस ठाकरेंचा व्हिडीओ समोर आणला

    राऊत घराघरांत भांडणं लावतात, नितेश राणेंचा आरोप

  • 03 May 2023 10:32 AM (IST)

    मुंबई : संजय राऊत हे शकुनी मामा - नितेश राणे

    नितेश राणेंकडून संजय राऊत यांचा शकुनी मामा म्हणून उल्लेख

    संजय राऊत हे घराघरांत भांडणं लावतात

    राऊत दुसऱ्यांच्या घरात आग लावतात

    संजय राऊत यांच्याकडे पाहून शकुनी मामालाही लाज वाटेल, राऊत हे त्यांच्यापेक्षाही कपटी

  • 03 May 2023 10:26 AM (IST)

    नवी मुंबई : शरद पवारांनी निवृत्ती मागे घ्यावी, बॅनरद्वारे विनंती

    - शरद पवार साहेब आपण राष्ट्रीय अध्यक्ष पदापासून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी सर्व पदाधिकारी व तळागाळातील सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे.

    - आपले मार्गदर्शन आज पर्यंत मिळालेले आहे असेच मार्गदर्शन या पुढे मिळत राहो.

    - अशा आशयाचे बॅनर नवी मुंबईत लागले आहेत

    - नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी नवी मुंबई भागात सर्वत्र लावले बॅनर्स

  • 03 May 2023 10:23 AM (IST)

    Gold Silver Price Today : सोने-चांदीची महागाईची वर्दी

    सोने-चांदीच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ

    विक्रमी भावापेक्षा मात्र सोने-चांदी स्वस्त

    19 एप्रिलपासून दरवाढीचे सत्र होते बंद

    आजचा सोने-चांदीचा भाव जाणूनच मग खरेदीला जाल

    सोने-चांदीचा भाव एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या, वाचा बातमी 

  • 03 May 2023 10:14 AM (IST)

    नाशिक ब्रेकिंग : 1 जूनपासून अहमदाबादसाठी नाशिकहून सकाळच्या सत्रात सुरू होणार दुसरी फ्लाईट

    - सध्या ओझर विमानतळावरून सायंकाळी नाशिकहून अहमदाबादसाठी होते उड्डाण

    - प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे उड्डाणे देखील वाढणार

    - 1 जून रोजी इंदोर आणि हैदराबादसाठी देखील इंडिगो कंपनी विमान सेवा सुरू करणार

  • 03 May 2023 10:10 AM (IST)

    मुंबई : शरद पवार कार्यकर्त्यांना भेटणार

    शरद पवार वाय.बी. चव्हाण सेंटरकडे झाले रवाना

    दुपारी 1 वाजेपर्यंत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन करणार चर्चा

  • 03 May 2023 10:05 AM (IST)

    शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे सिल्व्हर ओकवर

    निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे नेते घेत आहे शरद पवार यांची भेट

    राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सिद्धीविनायकला घालणार साकडं

  • 03 May 2023 09:59 AM (IST)

    आमदार दिलीप मोहिते अजित पवारांच्या बाजूनं

    पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते अजित पवारांच्या बाजूनं

    काल शरद पवार साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे

    नवीन नेतृत्वाच्या मागे उभं राहिलं पाहिजे तयार केलं पाहिजे ही भूमिका आहे

    शरद पवार रिटायर्ड होऊ नये असं कार्यकर्त्यांना वाटतं असतं मात्र त्यांनी विचार करून निर्णय घेतला असेल

    नेत्यानं घेतलेला निर्णय स्विकारला पाहिजे

  • 03 May 2023 09:54 AM (IST)

    सुप्रिया सुळे आज कर्नाटक दौऱ्यावर जाणार

    सुप्रिया सुळे आज कर्नाटक दौऱ्यावर जाणार

    राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सुळे कर्नाटकला जाणार

    फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंची माहिती

  • 03 May 2023 09:43 AM (IST)

    पुण्यात राजीनामे सत्र

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 125 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

    जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्षांचे राजीनामे

    पदाधिकाऱ्यांचे राजीनामे यायला सुरुवात झाली आहे

    आतापर्यंत 125 लोकांचे राजीनामे आलेत

  • 03 May 2023 09:37 AM (IST)

    अवकाळी पावसाची हजेरी

    यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. दारव्हा तालुक्यातील बोरी येथील अडाण नदीला पूर आल्याने वाहतूक खोळंबली. दारव्हा यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

  • 03 May 2023 09:35 AM (IST)

    Crude Oil : बरं ते, पेट्रोल-डिझेल स्वस्त कधी होणार

    जनतेला कधी देणार केंद्र सरकार दिलासा

    स्वस्तात इंधन खरेदीचा जोरदार डंका

    तेल कंपन्यांना फायदाच फायदा

    एक लिटर पेट्रोलमागे 10 रुपयांचा नफा

    तरी ही देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात का नाही, वाचा बातमी 

  • 03 May 2023 09:30 AM (IST)

    जी श्रीकांत संभाजी नगरचे आयुक्त

    छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी जी श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त जी श्रीकांत हे आज सकाळी 11 वाजता महापालिकेचा पदावर स्वीकारणारा आहेत. कधीकाळी जी श्रीकांत हे रेल्वे स्टेशनवर तिकीट चेकर म्हणून काम करत होते, जी श्रीकांत यांनी नंतर मोठ्या परिश्रमाने आयएएस ही पदवी संपादन केली, जी श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगरच्याच रेल्वे स्थानकावर तिकीट चेकर म्हणून काम करत होते. आज त्यांची याच शहरातल्या सर्वोच्च अशा महपालिका आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे.

  • 03 May 2023 09:20 AM (IST)

    दगड कोसळून भाविकाचा मृत्यू

    नाशिक ब्रम्हगिरी पर्वतावर दगड कोसळून भाविकाचा मृत्यू

    ब्रम्हगिरी पर्वतावर दर्शनासाठी गेला होता भाविक

    दर्शन करून खाली उतरत असताना ब्रम्हगुफेजवळ ५० किलोचा दगड अंगावर कोसळल्याने भाविकाचा जागीच मृत्यू

    भानुदास आरडे असं मृत भाविकाचं नाव असून ते बीडचे रहिवाशी असल्याची माहिती

    यापूर्वीही ब्रम्हगिरी पर्वतावर दरड कोसळून ४ भाविकांचा मृत्यू झाला होता

  • 03 May 2023 09:18 AM (IST)

    भंडाऱ्यात पाऊस

    भंडाऱ्यातील पालांदुरला वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी.

    वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीज खांब कोसळल्यानं विद्युत तारा लोंबकळल्यानं वीज पुरवठा खंडीत

    शेत पिकांचे मोठे नुकसान.

  • 03 May 2023 09:10 AM (IST)

    भावानेच केली बहिणीची निर्घृण हत्या

    शिर्डीत धक्कादायक घटना

    भावानेच केली बहिणीची निर्घृण हत्या

    काल रात्री घडली घटना

    बहिणीच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालून केली हत्या

    मुलीचे प्रेमसंबंध असल्याने भावाला राग अनावर झाल्याने भावानेच हत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

    ज्ञानेश्वरी कुलथे ( वय १७ ) अस मयत तरूणीच नाव

  • 03 May 2023 09:00 AM (IST)

    १ रुपयांत विवाह

    स्वतःला मुलगी नसताना शिर्डीतील एका दाम्पत्याने आत्तापर्यंत 2 हजाराहून अधिक मुलींचे कन्यादान केलेय. गेल्या 23 वर्षापासून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत अनेक सर्व सामान्य कुटूंबाला मोलाचा आधार त्यांनी दिलाय. अवघ्या एक रुपयात विवाह होत असल्याने साईंच्या पुण्यनगरीत यावर्षी 65 जोडप्यांनी आपल्या आयुष्याची लग्नगाठ या शाही विवाह सोहळ्यात बांधलीय...विशेष म्हणजे विदर्भातील 41 जोडप्यांनी या विवाह सोहळ्याचा लाभ घेतला.

  • 03 May 2023 08:59 AM (IST)

    Entertainment News Live | आलिया भट्टसोबत 'मेट गाला'मध्ये झाली सर्वांत मोठी चूक

    मेट गाला या प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये आलिया भट्टसोबत चूक

    सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल, वाचा सविस्तर..

  • 03 May 2023 08:56 AM (IST)

    Entertainment News Live | समंथाशी घटस्फोटानंतर नाग चैतन्यला 'या' गोष्टीचा मोठा पश्चात्ताप

    नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्यने केला खुलासा

    आयुष्यातील कोणत्या निर्णयाबद्दल तुला पश्चात्ताप होतो, असा प्रश्न विचारण्यात आला, वाचा सविस्तर..

  • 03 May 2023 08:48 AM (IST)

    Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण

    आज कोणत्या शहरात स्वस्त पेट्रोल-डिझेल

    राज्यातील या शहरात सर्वाधिक किंमत

    पेट्रोल-डिझेलच्या भावात नाही मोठी वाढ

    गेल्या 11 महिन्यांपासून भावात उलथापालथ नाही, वाचा सविस्तर 

  • 03 May 2023 08:46 AM (IST)

    अमरावती | अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्हात 1321 हेक्टरवरील पिकांची हानी

    अमरावती जिल्ह्यातील 178 घरांची पडझड

    मोर्शी तालुक्यात संत्रा बागांचे मोठे नुकसान

    चिखलदरा तालुक्यातही दहा हेक्टर वरील कांदा भिजला

  • 03 May 2023 08:35 AM (IST)

    नाशिक | नवीन वाळू धोरण राबविण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानेही निविदा राबविण्यास केली सुरुवात

    पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 13 घाटांवरील वाळू लिलाव होणार

    जिल्ह्यात सहा सरकारी वाळू डेपो सुरू होणार

    600 रुपये ब्रास एवढ्या माफक दरात वाळू मिळणार

  • 03 May 2023 08:28 AM (IST)

    पुणे | फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा; रेल्वेनं केली दोन कोटींची कमाई

    पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान 28,166 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले

    सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 206 जणांकडून 21 हजार रुपयांचा दंड वसूल

    पुणे रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशांवर सर्वाधिक कारवाई

  • 03 May 2023 08:17 AM (IST)

    नाशिक | रखडलेल्या कामांमुळे स्मार्ट सिटी कंपनीला मिळाली मुदतवाढ

    केंद्राच्या नगरविकास मंत्रालयाने पुढील वर्षी जूनपर्यंत वाढवली मुदत

    अतिरिक्त निधी मिळणार नाही, फक्त प्रलंबित कामे होणार पूर्ण

    जवळपास 2 हजार कोटींच्या आराखड्यात 51 प्रकल्पांचा करण्यात आला होता समावेश

  • 03 May 2023 08:11 AM (IST)

    नाशिक |1 जूनपासून अहमदाबादसाठी नाशिकहून सकाळच्या सत्रात सुरू होणार दुसरी फ्लाइट

    सध्या ओझर विमानतळावरून सायंकाळी नाशिकहून अहमदाबादसाठी होते उड्डाण

    प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे उड्डाणे देखील वाढणार

    1 जून रोजी इंदौर आणि हैदराबादसाठी देखील इंडिगो कंपनी विमान सेवा सुरू करणार

  • 03 May 2023 08:03 AM (IST)

    गडचिरोली | जिल्ह्यात रात्रभर पुन्हा बरसला पाऊस

    आज पहाटे पासूनच पाऊस सुरू

    धान पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

    विटभट्टी व्यावसायिकांवर पावसाचं संकट

  • 03 May 2023 08:02 AM (IST)

    नाशिक | शहरात पाच लाख पंधरा हजार मिळकतींची संख्या

    कर विभागाने नुकत्याच घेतलेल्या आढाव्यात सात वर्षात वाढल्या 2 लाख मिळकती

    मुंबई, पुणे आणि ठाणे यानंतर सेकंड होमसाठी नाशिकला पसंती

    मिळकतींची संख्या वाढल्याने घरपट्टीद्वारे पालिकेला मिळू शकणार दोनशे कोटींचे उत्पन्न

  • 03 May 2023 07:38 AM (IST)

    राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांचे राजीनामे

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे

    राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे

    राष्ट्रवादीच्या बहुतेक जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत

    त्यामुळे पवार यांच्यावरील दबाव वाढला असून पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

  • 03 May 2023 07:09 AM (IST)

    शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी बंदोबस्त वाढवला

    निवृत्तीच्या निर्णयानंतर गोविंद बागेच्या बंदोबस्तात वाढ

    कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची खबरदारी

    गोविंद बाग परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • 03 May 2023 07:07 AM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची बॅनर मार्फत विनंती

    "साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे"

    "केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा" अशा मजकूराचे लावले बॅनर

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर यांची बॅनरबाजी

  • 03 May 2023 07:04 AM (IST)

    राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, शरद पवार निर्णयावर ठाम की राजीनामा मागे घेणार?

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव

    वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवार यांची मनधरणी सुरू

    शरद पवार निर्णयावर ठाम, आज काय निर्णय होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष

Published On - May 03,2023 7:02 AM

Follow us
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.