AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या ऑक्सिजन गळतीत मुलाचा मृत्यू, सरकारकडून मिळालेले 10 लाख रुपये घेऊन सून पसार, वृद्ध आई-वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या जाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती (Nashik Oxygen Leakage Accident) प्रकरणात मृत झालेल्या एका परिवारातील सुनेने सरकारकडून मिळालेली मदत घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे .या घटनेत एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर किमान सरकारने दिलेल्या मदतीचा आधार होईल असं वाटत होतं.

नाशिकच्या ऑक्सिजन गळतीत मुलाचा मृत्यू, सरकारकडून मिळालेले 10 लाख रुपये घेऊन सून पसार, वृद्ध आई-वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Nashik Oxygen Leakage Death Help
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 12:53 PM
Share

नाशिक : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या जाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती (Nashik Oxygen Leakage Accident) प्रकरणात मृत झालेल्या एका परिवारातील सुनेने सरकारकडून मिळालेली मदत घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे .या घटनेत एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर किमान सरकारने दिलेल्या मदतीचा आधार होईल असं वाटत होतं. मात्र, सुनेने मिळालेली ही रक्कम परस्पर गायब केल्याने वृद्ध आई वडील हतबल झाले आहेत. या प्रकरणी या वृद्ध दाम्पत्याने जिल्हाधिकार्‍यांकडे, तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे (Son Died In Nashik Oxygen Leakage Accident Daughter In Law Take 10 Lack Rs Received From Government And Escaped Old Parents Filed Complaint).

या सगळ्या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणा देखील चक्रावून गेली आहे. कोरोना महामारीच्या काळात नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन गळती झाल्याचा प्रकार घडला होता. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 21 रुग्णांना महानगरपालिकेकडून पाच लाखांची मदत देण्यात आली होती. तर, राज्य सरकारने देखील 5 लाखांची आर्थिक मदत दिली होती. असे एकूण 10 लाख रुपये घेऊन या सुनेने पोबारा केला आहे.

सासु-सासऱ्यांकडून जबरदस्ती सह्या घेतल्या

लता पिरसिग महाले यांच्या मुलाला कोरोना झाल्यामुळे त्याला जाकीर हुसेन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, ऑक्सीजन गळती झाल्याने या दुर्घटनेत त्यांच्या मुलाचे निधन झाले. यानंतर पिरसिग महाले यांच्या घरामध्ये नांदत नसलेली त्यांच्या सुनेने बळजबरीने सही आणि अंगठ्याचा ठसा घेऊन मदत सुनेला मिळावी अशी कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्रांच्या आधारावर या सुनेने शासनाकडून आलेली सगळी आर्थिक मदत घेतली आणि सासू सासर्‍यांना वाऱ्यावर सोडल आहे.

जाकीर हुसेन रुग्णालयात नेमकं काय घडलं?

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर, दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात यश आलं. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 21 जणांचा मृत्यू झाला.

दीड तासांनी गळती रोखण्यास यश

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता.

Son Died In Nashik Oxygen Leakage Accident Daughter In Law Take 10 Lack Rs Received From Government And Escaped Old Parents Filed Complaint

संबंधित बातम्या :

Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.