देवेंद्र फडणवीस हेच पुढील काळात मुख्यमंत्री राहिले पाहिजे; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटासह भाजपमध्येही खळबळ माजली आहे. त्यामुळे शिंदे-भाजप गटातील हेवदावे वर येतात का अशीही चर्चा आता जोर धरु लागली आहे. 

देवेंद्र फडणवीस हेच पुढील काळात मुख्यमंत्री राहिले पाहिजे; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ
| Updated on: Sep 12, 2022 | 3:50 PM

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींन प्रचंड वेग आला आहे. महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राजकीय नेतृत्त्वांकडून अनेक प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, येथून पुढील काळात आपले कर्तव्य हेच असले पाहिजे की, देवेंद्र फडणवीस येथून पुढील काळात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं वक्तव्यही बावनकुळेंनी केल्यानंतर राजकीय खळबळ माजली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटासह भाजपमध्येही खळबळ माजली आहे. त्यामुळे शिंदे-भाजप गटातील हेवदावे वर येतात का अशीही चर्चा आता जोर धरु लागली आहे.