AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wine Capital Nashik | नाशिकमध्ये जांभळापासून वाइन निर्मिती; राज्यातली आगळीवेगळी मधुशाला…!

देशात सध्या जवळपास 42 वायनरीज आहेत. त्यापैकी 22 वायनरी एकट्या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळेच ‘नाशिक व्हॅली वाइन’ला केंद्र सरकारचे महत्त्वाचे असे भौगोलिक मानांकनही (जीआय) मिळाले आहे. कोणालाही वाटेल की येथेच कसा काय वाईन निर्मितीचा उद्योग फोफावला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाशिकचे अतिशय थंड असणारे आणि वाइनला पोषक असणारे तापमान.

Wine Capital Nashik | नाशिकमध्ये जांभळापासून वाइन निर्मिती; राज्यातली आगळीवेगळी मधुशाला...!
नाशिकमध्ये आता जांभळापासून वाइन निर्मिती केली जाणार आहे.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Mar 22, 2022 | 11:27 AM
Share

नाशिकः मद्य आणि वाइनच्या (Wine) शौकिनांसाठी आता एक खूशखबर. आयुर्वेदात ज्या जांभळाचे नाना प्रकारे महत्त्व सांगण्यात आले आहे. विशेषतः मधुमेह, हृदयविकार, पचनावर अतिशय गुणकारी मानल्या जाणाऱ्या जांभळापासून आता नाशिकमध्ये (Nashik) वाइन निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधवांच्या पोटापाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. खरे तर फळापासून वाइन निर्मिती करण्याचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. रासवेरा जांभूळ वाइन लाउंजने त्यासाठी पुढाकार घेतलाय. या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे नाशिकच्या पर्यटनात अजून भर पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिकची वाईन निर्मितीत वेगळीच ओळख आहे. नाशिकमध्ये पहिली वायनरी चक्क 35 वर्षांपूर्वी सुरू झाली. आणि तिथूनच नाशिकचे नाव वाइन कॅपिटल (Capital) म्हणून ओळखायला सुरुवात झाली. सध्या देशालील सर्वाधिक वायनरी नाशिकमध्ये आहेत. येणाऱ्या काळात यात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या किती वायनरी?

देशात सध्या जवळपास 42 वायनरीज आहेत. त्यापैकी 22 वायनरी एकट्या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळेच ‘नाशिक व्हॅली वाइन’ला केंद्र सरकारचे महत्त्वाचे असे भौगोलिक मानांकनही (जीआय) मिळाले आहे. कोणालाही वाटेल की येथेच कसा काय वाईन निर्मितीचा उद्योग फोफावला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाशिकचे अतिशय थंड असणारे आणि वाइनला पोषक असणारे तापमान. शिवाय दळवळणाच्या दृष्टीने मुंबई-पुणे हाकेच्या अंतरावर. त्यात मोठ्या प्रमाणात होणारी द्राक्ष लागवड. जिल्ह्यात जवळपास दीड ते पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांची लावगड होते. त्यात अनेक शेतकरी वाईनसाठी उपयोगी असणाऱ्या द्राक्षांची आवर्जुन लागवड करतात.

जांभूळ वाइनचा प्रवास काय?

जांभळापासून वाइन निर्मितीचा पहिला प्रयत्न 2013 मध्ये महाबळेश्वरच्या जंगलात झाला. मात्र, नाना अडचणींमुळे त्यात खंड पडला. त्यानंतर 2018 आणि 2019 मध्ये कॅनडातही जांभळापासून मद्य निर्मिती केली गेली. त्यात खनिजे, जीवनसत्त्वे, रेझव्हेरट्रॉ, ऍन्टी-ऑक्‍सिडेंट सापडले. या वाइनला ‘रेसवेरा’ नाव दिले. या मद्याची निर्मिती करताना जांभळाच्या बियाणापासून लगदा वेगळा केला जातो. त्यामुळे या बियाणांचा लागवडीसाठी उपयोग होतो.

कोणत्या फ्लेवरमध्ये मिळणार?

जांभूळ वाइन दोन फ्लेवरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यात शुद्ध जांभळ्या रंगासह डीप रुबी रेड वाइन आणि दुसरा फ्लेवर डीप रोझ वाइन आहे. या वाइन निर्मितीसाठी कोकण, सह्याद्री, नाशिक आणि इतर भागात पिकलेल्या जांभळाचा वापर करण्यात येणार आहे. जांभळाचे रेफ्रिजरेशन करणे शक्य नसते. त्यामुळे वेगळा प्रयोग करून या वाइनची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वाइन प्रेमींसाठी ही खास भेट असणार आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट