
नवीमुंबई येथील नवीन आंतराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच मोठ्या समारंभात प्रवाशांसाठी उद्घाटन होणार आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी या अत्याधुनिक विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अदानी ग्रुपद्वारा संचालित या नव्या विमान तळाला नागरी उड्डयन महासंचालनालयाकडून (DGCA) नुकतेच एअरोड्रम लायसन्स मिळाले आहे. त्यामुळे या विमानतळाने सर्व सुरक्षा आणि नियमांची पूर्तता केल्याचे हे प्रमाणपत्र असल्याने हा विमानतळ आता सेवेसाठी सज्ज झाला आहे.
या नव्या विमानतळाच्या उद्घाटनाच्या तयारीच्या निमित्ताने अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी एअरपोर्टच्या निर्मितीत गुंतलेल्या बांधकाम कामगार,दिव्यांग कर्मचारी, महिला कर्मचारी, इंजिनिअर, कारागिर, फायर फायटर आणि सुरक्षा गार्ड यांच्या व्यक्तीगत भेट घेतली. अदानी म्हणाले की हे यश हजारो हातांच्या मेहनतीचे फळ आहे. जेव्हा हे विमानतळ लाखो उड्डाणे आणि कोट्यवधी प्रवाशांना जोडण्याचे काम करेल, तेव्हा लोकांच्या मेहनतीचे प्रतीध्वनी प्रत्येक उड्डाण आणि प्रत्येक पावलावर जाणवले.
एअरपोर्टला मिळणारे DGCA चे एअरोड्रमचे लायसन्स या क्षेत्राला जगाशी जोडण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या सिडकोने या विमानतळाला पाच टप्प्यात विकसित केले आहे. पहिल्या टप्प्यात या एअरपोर्टची क्षमता सुमारे २ कोटी प्रवाशांना वार्षिक सेवा देणे हा आहे.
एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर सारख्या प्रमुख एअरलाईन्सने नवीमुंबई एअरपोर्टवरुन उड्डाण सेवा सुरु करण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. खास म्हणजे देशाची सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो या विमानतळावरुन पहिले कमर्शियल उड्डाण संचालित करणार आहे. इंडिगो पहिल्याच दिवशी १५ हून अधिक शहरांसाठी सुमारे १८ दैनिक उड्डाणे संचलित करणार आहे. एअर इंडिया देखील पहिल्या टप्प्यात देशातील १५ शहरांना जोडणाऱ्या दैनिक उड्डाणे संचालित करणार आहे.
येथे पाहा पोस्ट –
Ahead of the inauguration of Navi Mumbai International Airport on 8 Oct, I met with our differently-abled colleagues, construction workers, women staff, engineers, artisans, fire fighters and the guards who helped bring this vision to life. I felt the pulse of a living wonder – a… pic.twitter.com/Uj7Ikue7vM
— Gautam Adani (@gautam_adani) October 1, 2025
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर देशातील पहिला संपूर्णपणे ऑटोमेटेड कार्गो टर्मिनल स्थापन केलेला आहे. या सुविधने केवळ कार्गोचे संचालनच वेगात होणार नाही तर लॉजिस्टीक्स सेक्टरमध्ये देखील क्रांतीकारी बदल होणार आहेत. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट एकूण 1,160 हेक्टरवर पसरला असून हा आकार आणि क्षमता दोन्हीच्या बाबतीत प्रचंड विशाल आहे.