Ganesh Naik : गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज? बलात्काराचा गुन्हा, अटकेसाठी दबाव, चार दिवसांपासून बेपत्ता

| Updated on: Apr 20, 2022 | 1:19 PM

मुंबई : भाजपनेते आणि ऐरोलीचे आमदार आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका महिलेनं गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यावर नेरुळ पोलीस (Nerul Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अटक झालेली नाही. त्यानंतर त्या महिलेनं पुन्हा राज्य महिला आयोगाकडेही (State Women Commission) धाव […]

Ganesh Naik : गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज? बलात्काराचा गुन्हा, अटकेसाठी दबाव, चार दिवसांपासून बेपत्ता
भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार आमदार गणेश नाईक
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : भाजपनेते आणि ऐरोलीचे आमदार आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका महिलेनं गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यावर नेरुळ पोलीस (Nerul Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अटक झालेली नाही. त्यानंतर त्या महिलेनं पुन्हा राज्य महिला आयोगाकडेही (State Women Commission) धाव घेत तक्रार दाखल केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर आता ४ दिवस ओलटून गेले तरी गणेश नाईक यांना अटक झालेली नाही. तर पोलिसांकडून नाईकांचा शोध सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पोलिसांनी गणेश नाईक यांचं घर, कार्यालय आणि मुरबाडमधील फार्म हाऊसवरही शोध घेतल्याची माहिती मिळतेय.

बलात्काराचा गुन्हा दाखल

ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी रिव्हॉल्व्हर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यामहिलेने १९९३ पासून गणेश नाईक हे आपला लैंगिक शोषण करत होते. मानसिक छळ करत होते, असा आरोपही संबंधित महिलेने केला. त्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

राज्य महिला आयोगाकडेही धाव

त्यानंतर त्या महिलेनं पुन्हा राज्य महिला आयोगाकडेही धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर आता ४ दिवस ओलटून गेले तरी गणेश नाईक यांना अटक झालेली नाही.

पोलिसांकडून नाईकांचा शोध सुरु

गुन्हा दाखल दाखल होऊन 4 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून नाईकांचा शोध सुरु असल्याचे सांगत आहेत. तसेच त्यांनी गणेश नाईक यांचं घर, कार्यालय आणि मुरबाडमधील फार्म हाऊसवरही शोध घेतल्याची माहिती मिळतेय.

अटक पूर्व जमीनासाठी अर्ज

दरम्यान गुन्हा दाखल दाखल होऊन 4 दिवस झाल्यानंतरही त्यांना अटक झालेली नाही. त्यानंतर गणेश नाईक यांनी अटक पूर्व जमीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

इतर बातम्या :

Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केला; दीपा चौहान यांनी सांगितली आपबीती

Nanded | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येचे गूढ कायम, CBI कडे तपासाची मागणी, खा. चिखलीकर उद्या निदर्शनं करणार

Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले