नवी मुंबई : भाजपचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने नाईक यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. सदर पीडित दीपा चौहान (Deepa Chauhan) यांनी माध्यमांसमोर आपली आपबीती सांगितली आहे. माझ्या न्याय हक्कासाठी ही लढाई मी लढत आहे. गेली 27 वर्ष मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आहे. गेले 27 वर्ष गणेश नाईक आणि मी रिलेशनशीपमध्ये होतो. गणेश नाईक हे नुसते मला आश्वासने द्यायचे. आमच्या या संबंधातून मला एक मुलगा सुद्धा झाला आहे. गणेश नाईकांनी मला आश्वासन दिले की मुलगा पाच वर्षाचा होताच मी वडील म्हणून त्याला नाव देईन परंतु गणेश नाईकांनी तसं काहीच केलं नाही. गणेश नाईकांनी आम्हाला कोणतच आर्थिक पाठबळ ही दिलेली नाही, असे दीपा यांनी माध्यमांसमोर सांगितले. (Ganesh Naik tortured physically and mentally told by Deepa Chauhan)