अमरावती : अमरावतीतील अचलपूर दंगलीप्रकरणी (Achalpur Violence)
सध्या अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच एक मोठी अपडेट समोर आलीय. अमरावतीच्या अचलपूर शहरात दोन गटांतील दगडफेक आणि हाणामारीच्या प्रकरणात आरोपींची कोठडी आता वढवण्यात आलीय. दगडफेक प्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही गटातील 24 आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देत न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. अचलपूरच्या न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागीतलेली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. तर दंगलीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडत आहेत. मंत्री यशमोती ठाकूर (Yashomati Thakur) या यामागील मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावरही अनेक गंभीर आरोप होत आहेत.