सोलापूर : सोलापूर जिल्हा आणि संबंध देशाच्या मनाला चटका लावून जाणारी एक घटना उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) घडलीय. कारण उत्तर घंडमधील एका अपघातात (Accident) सोलापूर आणि महाराष्ट्राने आपला सुपुत्र गमावला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने सोलापूर करांच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं आहे. त्यांच्या कुटुंबियांचा कंठही दाटला आहे. कारण उत्तराखंड येथे लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये जवान गोरख चव्हाण (Gorakh Chavan Death) यांना वीरमरण आलेय. जवान गोरख चव्हाण हे बार्शी तालुक्यातील रातंजन येथील रहिवासी आहेत. ह्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. गोरख चव्हाण हे बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मध्ये चालक या पदावर कार्यरत होते. हा अपघात आज आपल्या सर्वांवर काळ बनून कसोळला आहे.