AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai | डॉक्टरांनी वापरलेल्या ग्लोव्ह्जची धुवून पुन्हा विक्री, 263 गोण्या जप्त

वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा धुवून वापरण्याची क्‍लृप्ती नवी मुंबईत काही अज्ञातांनी शोधून काढली आहे.

Navi Mumbai | डॉक्टरांनी वापरलेल्या ग्लोव्ह्जची धुवून पुन्हा विक्री, 263 गोण्या जप्त
| Updated on: Aug 20, 2020 | 12:45 AM
Share

नवी मुंबई : डॉक्‍टरांकडून कोरोनाच्या रुग्णांना हाताळताना वापरात आलेले रबरी हातमोजे धुवून करुन (Used Rubber Gloves Re-sale) पुन्हा विक्री करणारी टोळी नवी मुंबईत सक्रीय झाली आहे. वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा विक्री करताना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला रंगेहात अटक केली. या व्यक्तीच्या अटकेनंतर पोलिसांना छापा टाकला असता 4 लाख नग हातमोजे आणि इतर मुद्देमाल असा एकूण 6 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सदर प्रकरणात पोलिसांना आढळून आलेल्या साहित्यावरुन मोठी टोळी सक्रीय असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले रबरी हातमोजे वापरलेले तर नाहीत ना, अशी भीती नागरिकांच्या मानात निर्माण झाली आहे (Used Rubber Gloves Re-sale).

देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णांना हाताळण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्यांची मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी आणि पुरवठा लक्षात घेता उत्पादन कमी असल्यामुळे काही ठिकाणी आवश्‍यक साहित्यांची किंमत वाढण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा धुवून वापरण्याची क्‍लृप्ती नवी मुंबईत काही अज्ञातांनी शोधून काढली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून या टोळ्यांचा मनसुबा धुळीस मिळवला आहे. पावणे एमआयडीसीतील गामी इन्डस्ट्रीअल पार्क येथे गाळा क्रमांक 29 आणि 80 येथे काही व्यक्ती कोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी वापरण्यात आलेले रबरी हातमोजे धूवून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल राख यांना मिळाली होती (Used Rubber Gloves Re-sale).

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत डॉक्‍टरांनी वापरलेले, न धुतलेले व धुतलेले तीन ते चार क्विंटलच्या अशा एकूण 263 गोण्या सापडल्या. या गोण्यांमध्ये डॉक्‍टरांनी वापरलेले निळ्या रंगाचे अंदाजे 4 लाख नग हातमोजे एका पाकिटात भरुन ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, हातमोजे धुण्यासाठी दोन वॉशिंग मशिन, धुतलेले हातमोजे सुकवण्यासाठी ब्लोअर मशिन, पॅकिंगचे साहित्य असा एकूण 6 लाख 10 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात घटनास्थळाहून प्रशांत सुर्वे या इसमाला ताब्यात घेतले आहे. डॉक्‍टरांकडून कोव्हिड रुग्णांसाठी वापरण्यात आलेले निळ्या रंगाचे रबरी हातमोजे नष्ट करण्याऐवजी काही इसम टोळीने बेकायदेशीररीत्या या वापरलेल्या रबरी हाजमोज्यांना धुवून पुन्हा विक्रीसाठी वापरत असल्याचा दाट संशय गुन्हे शाखेतर्फे व्यक्त केला जात आहे.

हातमोजे गोळा करण्यासाठी मजुरांचा वापर

दवाखान्यांमधून गोळा करण्यात आलेले वापरलेले रबरी हातमोजे काढून त्याचे वर्गीकरण करण्यासाठी 200 रुपयांच्या रोजंदारीवर मजूर घेण्यात आले होते. मजुरांच्या मदतीने रोज येणारे वापरलेले हातमोजे काढून मशिनमध्ये धुवून ते सुकवून नंतर पुन्हा एका चांगल्या पाकीटात विक्रीसाठी भरले जात होते.

Used Rubber Gloves Re-sale

संबंधित बातम्या :

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.