4 दिवसांत 22 हजार चाचण्या, पनवेलचा पॉझिटिव्हिटी रेट कमी, आयुक्तांच्या मोहिमेला यश

पनवेलमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजाराहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम हळूहळू दिसू लागला असून पनवेल कार्यक्षेत्राचा पॉझीटिव्हीटी दर कमी होऊन हा दर 2.5 झाला आहे.

4 दिवसांत 22 हजार चाचण्या, पनवेलचा पॉझिटिव्हिटी रेट कमी, आयुक्तांच्या मोहिमेला यश
पनवेल महापालिकेला कोरोनाला अटकाव घालण्यात यश

पनवेल : रायगड जिल्ह्याप्रमाणेच पनवेल कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4000 आरटीपीसीआर आणि ॲन्टीजन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजाराहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम हळूहळू दिसू लागला असून पनवेल कार्यक्षेत्राचा पॉझीटिव्हीटी दर कमी होऊन हा दर 2.5 झाला आहे.

अधिक चाचण्याने पॉझिटिव्हिटी रेट कमी

लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यापासून अनेकवेळा नागरिक विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही अजून संपलेली नाही. मागील महिन्यात पॉझीटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली होती मात्र गेल्या काही दिवसापासून या संख्येत कमी- अधिक प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

4 दिवसांत 22 हजार चाचण्या

डेल्टा प्लस विषाणूचा धोकाही वाढला आहे. एकूणच साऱ्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या पनवेल कार्यक्षेत्रात केल्या जात आहेत.

महापालिकेकडून तिसऱ्या लाटेआधी पूर्वतयारी

संभाव्य तिसऱ्या लाटेची सगळीकडे चर्चा सर्वत्र सुरू असताना महापालिकेने देखील याची पूर्वतयारी सुरू केली आहे. उपायुक्त सचिन पवार आणि मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या चाचण्या पनवेल कार्यक्षेत्रातील पनवेल, न्यू पनवेल,कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा या नोडमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करण्यात येत आहे. या नोडमधील गर्दीची ठिकाणे, बाजार, रेल्वे स्थानके, बस स्थानके, कंटेन्मेंट झोन, शासकीय आस्थापना, दुकाने अशा सर्व ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.

प्रभाग अधिकारी आणि पोलिस विभागाशी समन्वय साधून सर्व डॉ. प्रियांका माळी यांच्या नियोजनाप्रमाणे विविध नोडमधील संबधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरर्स त्यांच्या टिम सहीत सर्वत्र जाऊन आरटीपीसीआर व ॲन्टीजन चाचण्या करीत आहेत.

हे ही वाचा :

Maharashtra Coronavirus LIVE Update : डेल्टा प्लसने धाकधूक वाढवली, कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण?

(22 thousand tests in 4 days, Panvel’s positivity rate reduced, municipal Commissioner campaign success)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI